अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ ,नवनाथ आंधळे यांनी दिवाळीनिमित्त फराळ वाटप केला.हा उपक्रम शाळेत दरवर्षी राबविला जातो.दिवाळी सण हा खूप मोठा सण आहे.यानिमित्त अनेक घरांमध्ये गोड गोड पदार्थ बनवून त्यांचा. आस्वाद घेतला जातो.सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा केल्यास या सणाचा आनंद वाढतो .सर्वजण एकत्र आल्यास विचारांची देवाण घेवाण होऊन आत्मीयता ,आपुलकी ,सर्वधर्मसमभाव ,समानता ,बंधुता ,राष्ट्रीय एकात्मता अशी अनेक राष्ट्रहिताची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजतात म्हणून शाळेत दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळ वाटप उपक्रम राबविला जातो.यावेळी दिवाळी सणाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाते.विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे गोड ,स्वादिष्ट पदार्थ फराळ म्हणून वाटप केले जातात.शाळेत सर्व विद्यार्थी आनंदाने हा फराळाचा आस्वाद घेतात.लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून हा फराळ वाटप उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो तसेच शाळेत वर्षभर विविध सण समारंभ आनंदाने साजरे केले जातात असे या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी सांगीतले आहे.या उपक्रमाचे गावातील पालक ,ग्रामस्थ ,अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा