अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून प्राथमिक विभागातून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांची निवड करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या स्वाक्षरीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.राज्याचे पर्यटन ,कौशल्य विकास विभाग ,महिला व बालकल्याण या विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा ,राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,आमदार कपिल पाटील ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर ,राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी ,माध्...