नाव-तुकाराम तुळशिराम अडसूळ
पद-उपाध्यापक
शाळा -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
सेवारंभ तारीख -३१ /१२/१९९६
एकूण सेवा-२६ वषे
राज्य पुरस्कार प्राप्त -सन २०२१-२२
आमच्या या डोंगराळ भागातील शाळेत राबविलेले विविध उपक्रम खलील प्रमाणे--
कोरोनाकाळात वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तकांचे प्रदर्शन भरविले त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तके वाचली आणि कोरोनानंतर आठवड्यातून एकदा विविध अवांतर पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात वाचन संस्कृती रुजली.
२)लोकसहभाग-ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेला रंगकाम व पेंटिंग करून शाळेला एल.ई. डी.,संगणक ,सुसज्ज ग्रंथालय ,विविध खेळांचे साहित्य ,बेंचेस ,पिण्याच्या पाण्याची सुविधा ,,अशा अनेक भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पटसंख्या वाढली.
३)व्हिडीओ कॉन्फरन्स-विविध देशातील
प्रतिष्ठित लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन विद्यार्थ्यांना जगाची ओळख करून दिली.विविध देशातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
४)पर्यावरण संवर्धन-शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून शिक्षणाला पूरक निसर्गरम्य आनंददायी वातावरण निर्माण करून गावाला अभिमान वाटावा अशी आदर्श शाळा निर्माण केली.शाळेमार्फत वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांना ,ग्रामस्थांना विविध रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धन बाबत जनजागृती केली,
५)प्रदूषण निवारण -हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत.यांपैकीं एकाचे जरी प्रदूषण झाले तरी आपल्या जीवनास धोका निर्माण होतो.म्हणून याबाबत शाळेत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण थांबविले.
६)प्लॅस्टिकमुक्त शाळा, गाव -प्लॅस्टिक हे सर्व सजीवांच्या जीवनास घातक आहे.विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये याबाबत जनजागृती करून गावातील प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यामुळे शाळा ,गाव प्लॅस्टिकमुक्त होण्यास मोठी मदत झाली.विद्यार्थी ,ग्रामस्थ प्लॅस्टिक वापर करत नाही.विद्यार्थी पर्यावरण पूरक वस्तू तयार करून वापर करतात.
७)योग प्राणायाम शिबीर-कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ऑनलाईन योग प्राणायाम शिबीर घेतले.विद्यार्थ्यांमधील कोरोबाबत असणारी भीती दूर केली.
८)शिकू आनंदे-कोरोनाकाळात विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती दूर करून त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन मूल्य रुजण्यासाठी शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना सेंद्रिय परसबाग निर्मिती, रोपे निर्मिती याबाबत ऑनलाईन कृतिशील मार्गदर्शन केले.विद्यार्थी शिकू आनंदे उपक्रमात कृतिशील सहभाग घेतात.
९)लेखक,कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला-या उपक्रमातुन पाठयपुस्तकातील लेखक ,कवी यांचेशी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन ,ऑफलाईन संवाद घडवून आणले.त्यामुळे कवी ,लेखक निर्माण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.
१०)आय.सी.टी.तंत्रज्ञानाचा वापर- दीक्षा ,व्ही.स्कुल ,रीड टू मी ,यू ट्यूब ,संगणक ,एल.ई. डी.,ब्लू टूथ ,स्मार्ट फोन यांचा वेळोवेळी वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले.त्यांना तंत्रज्ञान तंत्रज्ञान अवगत झाले.
११)सामान्यज्ञान -दररोज ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गातील विद्यार्थी समान्यज्ञानावर आधारित इतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढले.
१२)ऑनलाईन व ऑनलाईन शिक्षण-कोरोनाकाळात शाळा बंद होत्या पण विद्यार्थ्यांचे शिक्षण दररोज ऑनलाईन तास घेऊन आणि दररोज विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे ऑफलाईन शिक्षण चालू ठेवले.
१३)सैनिकांचे मार्गदर्शन -शाळेतील अनेक माजी विद्यार्थी भारतीय सैन्यात कार्यरत असून ते आपल्या देशाची उत्कृष्ट पणे सेवा करतात.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती ,देशरक्षण हे मूल्य रुजण्यासाठी सैनिक वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
१४)पक्षांना चारा पाणी-पर्यावरण संवर्धनात प्रत्येक सजीव महत्वाचा आहे,एक सजीव दुसऱ्यावर अवलंबून असतो.पक्षांमुळे बीजप्रसार होऊन वृक्षारोपणसाठी मोठी मदत होते.म्हणून आपण पक्षांचे रक्षण केले पाहिजे,उन्हाळ्यात पक्षांना चारा पाणी मिळत नाही म्हणून विद्यार्थी उन्हाळ्यात पक्षांसाठी घराच्या छतावर चारा पाणी ठेवतात.
१५)बँकेस भेट- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात बँकेबद्दल माहिती आहे,विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराची माहिती व त्याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना बँकेत नेऊन बँकेच्या व्यवहाराची व कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
१६)रक्तदान-रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,रक्तदान म्हणजे जीवदान.रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला रक्त मिळून जीवदान मिळते म्हणून गावात याबाबत विद्यार्थ्यांची फेरी काढून जनजगृती केली.
१७)अवयव दान-आपल्या नंतर आपल्या शरीराचे अवयव इतर व्यक्तींना जीवदान देऊ शकतात म्हणून आपण अवयवदान केले पाहिजे .याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये प्रभातफेरीतून जनजगृती केली.
१८)नेत्रदान-आपल्या मृत्यूनंतर हे सुंदर जग आपले डोळे पुन्हा पाहू शकतात म्हणून आपण नेत्रदान केले केले पाहिजे.याबाबत विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.
१९)परिसर भेट-परिसरातून आपल्या गरजा पूर्ण होतात म्हणून आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचे आपण रक्षण केले पाहिजे.यासाठी परिसरातील पिके ,डोंगर ,नदी ,ऐतिहासिक स्थळे यांना भेटी देऊन त्याबाबत माहिती सांगून परिसर रक्षणाचे महत्व समजावून दिले.विद्यार्थी परिसराचे रक्षण करतात.
२०)व्यावसायिक शिक्षण क्षेत्रभेट-आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात अनेक व्यवसाय चालत असतात.व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना किराणा दुकान ,पिठाची गिरणी ,कापड दुकान ,फळ विक्रेता ,चरखे निर्मिती ,फर्निचर निर्मिती ,,,,,,,अशा अनेक दुकानांना विद्यार्थ्यांनि प्रत्यक्ष भेट देऊन व्यावसायिकांची मुलाखत घेऊन सविस्तर माहिती मिळविली.
२१)रोपे निर्मिती- ऋतुमानानुसार आपण जी फळे खातो त्या फळांच्या बियांचा विद्यार्थी संग्रह करतात .त्या बिया ,तेलाची पिशवी यांपासून घरच्या घरी रोप कसे तयार करावे याबाबत विद्यार्थ्यांना कृतिशील माहिती दिली.विद्यार्थी घरच्या घरी रोप तयार करतात.
२२)शैक्षणिक सहल-विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेर नेऊन शैक्षणिक सहलीतून विविध ठिकाणांना भेटी देण्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला.त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध ठिकाणांची ओळख झाली.त्यांची निरीक्षणशक्ती वाढली.त्यांना बाहेरील जगाचा अनुभव मिळाला.
२३)विद्यार्थ्यांचे वाढदिवस-विद्यार्थ्यांचे वाढदिवस पर्यावरणपूरक साजरे केले जातात. त्यांच्या वाढदिवसास वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेले झाडाचे रोप भेट म्हणून दिले जाते.विदयार्थी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करतात.
२४)गणित विज्ञान प्रदर्शन-शाळा पातळीवर अगोदर गणित विज्ञान प्रदर्शन भरविले जाते.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी कृतिशील सहभाग घेतात. यातील यशस्वी विद्यार्थी तालुका पातळीवरील प्रदर्शनात सहभागी होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.
२५)आपत्कालीन मदत-ज्या ज्या वेळी काही निसर्गनिर्मित संकटे येतात.त्यामुळे जीवित व वित्त हानी होते.त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी बाबत जाणीव निर्माण होण्यासाठो जनजागृती केली .आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली जाते.
२६)ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा-कोरोनाकाळात विद्यार्थ्यांनी जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध ऑनलाईन स्पधेत कृतिशील सहभाग घेतला.त्यांनी या स्पर्धेत यश मिळविले. तसेच इतर विविध ऑफलाईन स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होऊन यश मिळवितात.
२७)शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक-शिक्षण हा सर्व बालकांचा हक्क आहे.शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास होय.म्हणून शाळेतील जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना शिक्षणात अडचण येऊ नये मदत केली जाते.त्यांना शिक्षणात विविध सुविधा स्वतःच्या लोकसहभागातून पुरविल्या जातात.शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे.
२८)स्नेहसंमेलन -विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्यातील सुप्तशक्तीला वाव मिळावा म्हणून दरवर्षी स्नेहसंमेलन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या स्नेहसंमेलनात शाळेतील सर्व विद्यार्थी कृतिशील सहभाग घेतात.
२९)स्वाध्याय उपक्रम- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा राबवित असलेल्या साप्ताहिक ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम कोरोनाकाळा पासून राबविला जातो.या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी आनंदाने या सहभागी होतात व ऑनलाईन स्वाध्याय सोडवितात.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी होण्यास मदत झाली .
३०)ब्लॉग व यू ट्यूब चॅनल- शाळेतील विद्यार्थ्यांना आणि इतर शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतःचा ब्लॉग आणि यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे.त्यामुळे यामधील साहित्याचा विद्यार्थी व शिक्षकांना वेळोवेळी मदत होते.
३१)सेंद्रिय परसबाग- सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.शिक्षणातून विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे मिळावेत म्हणून शाळेत विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग घेऊन सेंद्रिय परसबाग तयार केली आहे.त्यांना यामधून सेंद्रिय परसबागेचे महत्व समजले.विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केली.शाळेत सेंद्रिय भाजीपाला बाजार भरविला जातो.
३२)सेंद्रिय खत प्रकल्प- सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खत वापरणे महत्वाचे असते.विद्यार्थी शाळेत कचरा करत नाहीत.शाळेतील झाडांच्या पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते झाडांच्या रोपांना दिले जाते.विद्यार्थी सेंद्रिय खत तयार करतात.
३३)रेन वॉटर हार्वेस्टिंग-पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाते.त्याचा योग्य वापर होण्यासाठी शाळेच्या छतावरील पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग लोकसहभागातून निर्माण केले.विद्यार्थ्यांना याबाबत महत्व समजले आहे.
३४)पोस्टास भेट-विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात पोस्टाबाबत माहिती आली आहे.पोस्टाचे कामकाज कसे चालते?लोकांसाठी पोस्टाच्या कोणत्या योजना असतात?लोकांसाठी पोस्ट ऑफिस कोणती कामे करते?याबाबत विद्यार्थ्यांना समक्ष पोस्ट कार्यालयात नेऊन पोस्ट कार्यालयाची प्रत्यक्ष माहिती घेतली.विद्यार्थ्यांनी पोस्टकार्यालय बाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी पोस्टमनची मुलाखत घेतली.
३५)ज्ञानरचनावाद-विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळावे म्हणून शाळेत ज्ञानरचनावाद पद्धतीचा अवलंब केला जातो.त्यामधून विद्यार्थी सर्व गणिती क्रिया करतात.
३६)विविध खेळ-खेळातून आनंददायी शिक्षणासाठी लोकसहभागातून अनेक प्रकारच्या खेळाचे साहित्य घेतले आहे.लेझीम ,ढोल ,ताशा ,घुंगरुकाठी ,डंबेल्स ,दोरीउडया ,बॅडमिंटन ,फुटबॉल ,क्रिकेट ,बुद्धिबळ ,लंगोरी ,कॅरम ,खो खो ,कबड्डी,रिले ,लिंबू चमचा ,,,असे अनेक प्रकारचे खेळ घेतले जातात.विविध खेळांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
३७)प्रदूषणमुक्त सणसमारंभ-प्रदूषण हे सर्व सजीवांच्या आरोग्यास घातक आहे.हवा ही आपली सर्वात महत्वाची गरज आहे.हवेचे प्रदूषण झाल्यास आपल्या जीवनास धोका निर्माण होतो.विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती केली.विद्यार्थी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात.
३८)विद्यार्थी झाले शिक्षक-शिक्षक हा राष्ट्रनिर्माता असतो.शिक्षक समाजपरिवर्तन करतो.विद्यार्थ्यांना याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी म्हणून शिक्षक दिनी विद्यार्थी शिक्षक होऊन शिक्षकांची भूमिका पार पाडतात.
३९)विद्यार्थी हस्तलिखित-विद्यार्थ्यांच्या लेखनास वाव मिळावा.त्यांच्यामधून उद्याचे लेखक निर्माण व्हावेत म्हणून विद्यार्थी हस्तलिखित उपक्रम वेळोवेळी राबविला जातो.विद्यार्थी गाणी ,कविता ,बालगीते,बडबडगीते यांचे उत्कृष्ट पणे लेखन करतात.
४०)पाठांचे नाटयीकरण -अध्यापनात आनंददायी शिक्षण महत्वाचे असते.विद्यार्थ्यांना अध्यापनात ज्ञानाबरोबर आनंद मिळण्यासाठी पाठांचे नाटयीकरण केले जाते.विद्यार्थी पाठातील भूमिका आनंदाने पार पाडतात.अध्ययन अध्यापनात त्यांना आवड निर्माण होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे अनेक उपक्रम वेळोवेळी राबविले.
श्री .तुकाराम तुळशिराम अडसूळ
उपाध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा