अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला.राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून प्राथमिक विभागातून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांची निवड करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या स्वाक्षरीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.राज्याचे पर्यटन ,कौशल्य विकास विभाग ,महिला व बालकल्याण या विभागाचे मंत्री ना.मंगलप्रभात लोढा ,राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,आमदार कपिल पाटील ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर ,राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी ,माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांचे हस्ते मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून संवाद साधून राज्यातील पुरस्कार्थी शिक्षकांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आपल्या संदेशद्वारे शिक्षकांच्या कार्याचे अभिनंदन केले.तुकाराम अडसूळ यांनी पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद शाळेत उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करून लोकसहभागातून या शाळेत परिवर्तन केले.त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा