मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचन उपक्रम बातमी सकाळ पुणे

📕राज्यस्तरावर उपक्रमाची दखल📘 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी  आमच्या शाळेतील कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाची दखल  घेवून संपूर्ण राज्यात शासनाच्या जीवन शिक्षण मासिकात  प्रसिद्धी दिली होती.याबाबत माहिती घेवून  काल अचानक  पुणे येथील  सकाळ वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयामधून  मीनाक्षी ताई गुरव यांचा  फोन आला . या उपक्रमाबाबत तसेच शाळेतील इतर विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी    त्यांनी  शाळेतील विविध उपक्रम आणि इतर शालेय बाबींविषयी   विद्यार्थ्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली.विद्यार्थ्यांनी आनंदाने त्यांना शालेय उपक्रमांची व इतर बाबींची  माहिती दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना  विद्यार्थ्यांनी प्रथमच मिडीयाशी आनंदाने संवाद साधला. आमच्या  शाळेत आठवड्यातून एकदा  विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्याना वाचनासाठी पुस्तके दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण होवून घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.कोरोनापूर्वी ...

देशसेवेबद्दल मार्गदर्शन

🪴देशसेवेबद्दल मार्गदर्शन🪴  आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर शाळेचे माजी विद्यार्थी मनोज कारखीले हे जानेवारी २०२० पासून भारतीय सैन्यात एअर फोर्स मध्ये नवी दिली येथे सेवेत आहेत.ते सध्या गितेवाडी येथे सुट्टीवर आले आहेत.आमच्या शाळेत देशसेवेसाठी सैनिकांचे मार्गदर्शन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जातो.आज आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी सैनिक मनोज कारखिले यांनी विद्यार्थ्याना देशसेवेबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना मुलींनी राख्या बांधल्या.नवी दिल्ली येथे ते आपल्या देशाची उत्कृष्टपणे सेवा करत आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला वेळोवेळी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घरचा अभ्यास

📕विद्यार्थी अभ्यास📘 विद्यार्थी घरी दिलेला अभ्यास नियमितपणे करतात.वर्गात प्रथम विद्यार्थ्याना घरी दिलेला अभ्यास तपासला जातो.विद्यार्थी हा अभ्यास कसा करतात याबाबत  काल शाळा सुटल्यावर काही विद्यार्थ्यांच्या घरी अचानक भेटी दिल्या .विद्यार्थी आनंदाने अभ्यास करताना आढळले.काही विद्यार्थी गटागटाने अभ्यास करताना दिसले.त्यांच्याशी याबाबत संवाद साधला असता आम्ही वेळोवेळी एकमेकांशी काही घटकांबाबत चर्चा करून अभ्यास करतो असे या चिमुकल्यांनी सांगितले. याबाबत पालकांशी संवाद साधला असता विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांचा अभ्यास पूर्ण करून आमची सही घेतात असे आनंदाने सांगितले.या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून आणखी काही मार्गदर्शन केले. यावेळी एक वेगळे समाधान व मनस्वी आनंद झाला.📕📘📙📕📘📙📕📘📙