📕विद्यार्थी अभ्यास📘
विद्यार्थी घरी दिलेला अभ्यास नियमितपणे करतात.वर्गात प्रथम विद्यार्थ्याना घरी दिलेला अभ्यास तपासला जातो.विद्यार्थी हा अभ्यास कसा करतात याबाबत काल शाळा सुटल्यावर काही विद्यार्थ्यांच्या घरी अचानक भेटी दिल्या .विद्यार्थी आनंदाने अभ्यास करताना आढळले.काही विद्यार्थी गटागटाने अभ्यास करताना दिसले.त्यांच्याशी याबाबत संवाद साधला असता आम्ही वेळोवेळी एकमेकांशी काही घटकांबाबत चर्चा करून अभ्यास करतो असे या चिमुकल्यांनी सांगितले. याबाबत पालकांशी संवाद साधला असता विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांचा अभ्यास पूर्ण करून आमची सही घेतात असे आनंदाने सांगितले.या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून आणखी काही मार्गदर्शन केले.
यावेळी एक वेगळे समाधान व मनस्वी आनंद झाला.📕📘📙📕📘📙📕📘📙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा