📕राज्यस्तरावर उपक्रमाची दखल📘
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आमच्या शाळेतील कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाची दखल घेवून संपूर्ण राज्यात शासनाच्या जीवन शिक्षण मासिकात प्रसिद्धी दिली होती.याबाबत माहिती घेवून
काल अचानक पुणे येथील सकाळ वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयामधून मीनाक्षी ताई गुरव यांचा फोन आला . या उपक्रमाबाबत तसेच शाळेतील इतर विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी
त्यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि इतर शालेय बाबींविषयी विद्यार्थ्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली.विद्यार्थ्यांनी आनंदाने त्यांना शालेय उपक्रमांची व इतर बाबींची माहिती दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना विद्यार्थ्यांनी प्रथमच मिडीयाशी आनंदाने संवाद साधला.
आमच्या शाळेत आठवड्यातून एकदा विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्याना वाचनासाठी पुस्तके दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण होवून घराघरात वाचन संस्कृती रुजली आहे.कोरोनापूर्वी , कोरोनाकाळात आणि कोरोनानंतरही आमच्या शाळेतील वाचन उपक्रम निरंतर चालू आहे. या उपक्रमास त्यांनी सकाळ वृत्तपत्राच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातून संपूर्ण राज्यात आज प्रसिद्धी दिली.त्याबद्दल त्यांना व आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा