🪴देशसेवेबद्दल मार्गदर्शन🪴
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर शाळेचे माजी विद्यार्थी मनोज कारखीले हे जानेवारी २०२० पासून भारतीय सैन्यात एअर फोर्स मध्ये नवी दिली येथे सेवेत आहेत.ते सध्या गितेवाडी येथे सुट्टीवर आले आहेत.आमच्या शाळेत देशसेवेसाठी सैनिकांचे मार्गदर्शन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जातो.आज आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी सैनिक मनोज कारखिले यांनी विद्यार्थ्याना देशसेवेबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना मुलींनी राख्या बांधल्या.नवी दिल्ली येथे ते आपल्या देशाची उत्कृष्टपणे सेवा करत आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला वेळोवेळी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा