पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्य --------------------------------------------- हवा, पाणी, अन्न अशा आपल्या अनेक गरजा परिसरातून पूर्ण होत असतात. परिसरात जैविक व अजैविक म्हणजे सजीव निर्जीव असे दोन घटक असतात त्यांचा पर्यावरणात समावेश होतो. परिसराचे ,निसर्गाचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण .पर्यावरणाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा.आपल्याला , आपल्या भावी पिढीला आणि इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अत्यंत गरजेचे आहे. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी एका जरी घटकाचे प्रदूषण झाले तरी आपल्याला व सर्व सजीवांच्या जीवनात धोका निर्माण होतो. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही काळाची गरज आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .पर्यावरण संवर्धनासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यापैकी एक पर्यावरण रत्न म्हणजे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे होय .आबासाहेब मोरे यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण न...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ