अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा २०२१ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार कोरोनानंतर नुकताच १७ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास संसदेचे सदस्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व इतर विविध मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते . यावेळी जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनी ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गितेवाडी येथील सरपंच भाऊसाहेब पोटे ,उपसरपंच राजेंद्र गिते ,माजी सरपंच महादेव गिते ,जनार्दन गिते ,डॉ.रामेश्वर गिते,नवनाथ आंधळे ,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ ,नारायण मंगलारम ,हिवरे कोरडा येथील सरपंच दत्ता कोरडे या सोहळ्यास उपस्थित होते.उपक्रमशिल शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी नगर तालुक्यातील जेऊर आणि पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून ग्रामस्थांच्या सहकार्याने परिवर्तन केले. लोकसहभागातून गितेवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या .संगणक ,एलईडी ,पिण्याच्या पाण्याची सुविधा , शाळा दुरुस्ती,स्वच्छतागृह ,रेन वॉटर हार्वेस्टिंग , शाळा पेंटिंग ,शाळा डिजिटल ,शाळा ई लर्निंग तसेच बेंचेस, विविध खेळांचे साहित्य मिळविले .शाळेत लोकसहभागातून सुसज्ज वाचनालय सुरू केले. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारचे ऑनलाइन आणि विद्यार्थी गृहभेटीद्वरे ऑफलाइन शिक्षण दिले. कोरोनाकाळात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्टपणे चालू ठेवले . ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आणि घराघरात वाचन संस्कृती रुजविली.शाळेत कायमस्वरुपी वाचन उपक्रम राबविला जातो. व्हिडीओ कॉन्फरन्स उपक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांना जगाची ओळख करून दिली .लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रमातून पाठ्यपुस्तकातील लेखकांचे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणले. शाळेची विद्यार्थी पटसंख्या वाढली .शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली.अध्ययन अध्यापनात संगणक, एल.ई.डी ,विविध प्रकारचेॲप असे अनेक ई साहित्य व आय.सी.टी .तंत्रज्ञानाचा नेहमी आनंददायी पद्धतीने वापर केला.
तालुका, जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थ्यांना यासाठी वेळोवेळी तुकाराम अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. शाळेत पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवीन उपक्रम राबवून शिक्षणाला पूरक असे आनंददायी वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले. राज्यस्तरावर शासनाच्या शिकू आनंदे, शाळा स्वच्छता कृती आराखडा मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट काम केले .कोरोना काळात विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी शाळेतील आणि राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आणि पर्यावरण संमेलन आयोजनात कृतिशील सहभाग घेवून राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित कार्यपुस्तिका निर्मितीसाठी शासनाने त्यांची निवड केली होती.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्रदान केला. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले ,विस्तार अधिकारी एस.एम. ढवळे ,के.आर.ढवळे यांनी या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट निवेदन व सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा