पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्य
---------------------------------------------
हवा, पाणी, अन्न अशा आपल्या अनेक गरजा परिसरातून पूर्ण होत असतात. परिसरात जैविक व अजैविक म्हणजे सजीव निर्जीव असे दोन घटक असतात त्यांचा पर्यावरणात समावेश होतो.
परिसराचे ,निसर्गाचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण .पर्यावरणाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा.आपल्याला , आपल्या भावी पिढीला आणि इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अत्यंत गरजेचे आहे. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी एका जरी घटकाचे प्रदूषण झाले तरी आपल्याला व सर्व सजीवांच्या जीवनात धोका निर्माण होतो. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही काळाची गरज आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .पर्यावरण संवर्धनासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यापैकी एक पर्यावरण रत्न म्हणजे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे होय .आबासाहेब मोरे यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रहितासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत केलेले कार्य पाहून मी प्रभावित झालो. आपणही या राष्ट्रहिताच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे असा निर्धार करून सन 2014 मध्ये संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे व तत्कालीन संस्थेचे सचिव प्रमोददादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ,संरक्षण व प्रदूषण निवारण बाबत कार्य सुरू केले. त्यांनी या कार्यात शिक्षक व इतर विविध क्षेत्रातील व्यक्तींना सहभागी करून घेतले. पर्यावरण रक्षणाचा व प्रदूषण निवारणाचा रथ त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे चालविला .या संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय आबासाहेब मोरे व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सध्याचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा व संधी मिळाली:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर (बा) तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील शाळेत लोकसहभागातून प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून शाळेत शिक्षणाला पूरक, निसर्गरम्य, आनंददायी वातावरण तयार केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण मूल्य विविध उपक्रम राबवून रुजविले .या शाळेला जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उपवनसंरक्षक ,जिल्हा शिक्षणाधिकारी,वृक्षमित्र स्वर्गीय बाबासाहेब मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन केलेल्या कार्याचे अभिनंदन केले. शाळेची विद्यार्थी पटसंख्या वाढली .गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला . सन 2018 मध्ये जेऊर शाळेतून पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बदली झाल्यावर त्या ठिकाणीही लोकसहभागातून शाळेत वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करून शाळेत निसर्गरम्य वातावरण तयार करून आदर्श शाळा निर्माण केली. शाळेची विद्यार्थी पट संख्या वाढली.राज्याचे तत्कालीन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्या उपस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांचा , ग्रामस्थांचा ,महिलांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा आयोजित करून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण बाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली ..वृक्षारोपणासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध झाडांची रोपे वाटप केली. सर्वांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजन चे महत्व समजले म्हणून कोरोणा काळात विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन रोपे विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमातून वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे वाटप केली. कायमस्वरूपी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी रोपे घरच्या घरी कशी तयार करावीत याबाबत विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करून विविध झाडांची रोपे तयार केली .आमच्या शाळेतील विद्यार्थी स्वतः विविध झाडांची रोपे तयार करतात .विविध कार्यक्रमात ही झाडांची रोपे भेट देतात तसेच वाढदिवसास झाडाचे रोप भेट देतात.हवा ,पाणी , अन्न यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये विविध उपक्रमातून जनजागृती केली . विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .तसेच इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनाही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून जनजागृती केली जाते. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेने सन 2016 पासून सुरू केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजनात कृतिशील सहभाग घेतला .पर्यावरण संमेलनात ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे , वृक्षमित्र आबासाहेब मोरे ,प्रमोद दादा मोरे ,धीरज वाटेकर व इतर अनेक पर्यावरण तज्ञांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले. या संस्थेने पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारणासाठी आयोजित केलेल्या भूतान देश पर्यावरण अभ्यास दौर्यात कृतिशील सहभाग घेऊन त्याप्रमाणे पर्यावरण संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य नेहमी करत आहे .महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी, 13 कोटी ,33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात कृतिशील सहभाग घेतला आहे.यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सतत तीन वर्षे शासनाच्या वनीकरण विभागाने सन्मानपत्र देवून सन्मानित केले. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणासाठी समाजात विविध ठिकाणी जनजागृती वृक्षारोपण उपक्रमात कृतिशील सहभाग घेतला . विवाह समारंभात विविध झाडांची रोपे वाटप केली.प्लॅस्टिक वापर विरोधात समाजात जनजागृती केली.शाळेत व पालकांच्या घरी सेंद्रिय परसबाग ,सेंद्रिय खत प्रकल्प तयार केला.शाळेत रेनवॉटर सुविधा निर्माण केली. या संस्थेने जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2022 रोजी बारामती येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत कृतिशील सहभाग घेतला.विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण मूल्य रुजविण्यासाठी या संस्थेचे वेळोवेळी उपयुक्त मार्गदर्शन मिळते. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, संरक्षण ,प्रदूषण निवारण कार्यात राज्यातील विविध शिक्षक व इतर अनेक क्षेत्रातील पर्यावरणप्रेमी जोडले गेले असून राष्ट्रहितासाठी हे महान कार्य सतत चालू असते याचा नेहमी अभिमान वाटतो
श्री. तुकाराम अडसूळ
जिल्हाध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अहमदनगर
मो.7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा