सन्मान आदर्श कार्याचा ..........
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी परिसरातील गितेवाडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक तुकाराम अडसूळ सर जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित झाले.🚩🚩🚩🚩🚩 गितेवाडी सारख्या छोट्याशा गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आदर्श प्रयोग राबवून शिक्षणाचे सुंदर कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खरोखरच तुकाराम अडसूळ सर यांचे कार्य पुरस्कारा योग्य आहे. शाळा छोटीशी गाव छोटेसे पण त्यांनी छोटी छोटी मुलं घडवण्याचं खूप सुंदर काम केलं. आपले सहशिक्षक आंधळे सर यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळावं यासाठी शाळेमध्ये अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रयोग करून त्यांनी छोटी छोटी मुलं हुशार बनवण्याचे कार्य केलं.🚩🚩🚩
शाळेच्या परिसर सुंदर बनवला. शाळेमध्ये एक भव्य स्वरूपात वाचनालय बनवलं. विद्यार्थ्यांना शिस्त वळण आणि अभ्यासाची आवड ही अतिशय महत्त्वाचं काम सरांनी करून दाखवलं .विद्यार्थ्यांना समोर घेऊन बोलायचं शिकवलं .
चांगल्या काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान झाला त्यांच्या कामाचा सन्मान झाला याबद्दल ग्रामपंचायत गितेवाडी ग्रामस्थ व सर्व पालक यांच्या वतीने मी अडसूळ सरांचे विशेष विशेष अभिनंदन करतो. व त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देतो.💐💐💐💐💐💐💐💐💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा