लाजरी बुजरी मुले , खेळू लागली खेळ. गमती जमतीने , घालू लागली मेळ. उपक्रम - शाळा पूर्वतयारी उपयुक्तता - या उपक्रमामुळे इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याना कृतीयुक्त ,आनंददायी शिक्षण मिळाले. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. त्यांना हसत खेळत शिक्षण मिळाले.या विद्यार्थ्याना शाळेची आवड निर्माण झाली. त्यांना शाळा घरासारखी वाटू लागली.ते नियमित आनंदाने शाळेत येतात.विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के झाली. विविध उपक्रमात हे विद्यार्थी आनंदाने कृतिशील सहभाग घेतात. या उपक्रमामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी ,त्यांच्या आवडी निवडी ,कौशल्य आणि विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहेत हे समजले.त्यामुळे विद्यार्थ्याना योग्य त्या बाबींवर वैयक्तिक मार्गदर्शन करणे सोपे झाले.या उपक्रमात पालकांचा सहभाग घेतल्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देवू लागले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत झाली. तसेच शाळा पूर्वतयारी बाबत कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत याबाबत प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना मिळाला. शिक्षकाचे नाव - श्री तुकाराम तुळशीराम अडसूळ पद - उपाध...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ