🙏सैनिक विद्यार्थ्यांच्या भेटीला व रक्षाबंधन🙏
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी
येथे आज दप्तरमुक्त शनिवार उपक्रमात सैनिकांचे मार्गदर्शन व रक्षाबंधन उपक्रम राबविला .यामध्ये भारत बांगलादेश सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी भारतीय संरक्षण सेवेतील सैनिक अक्षय गिते आणि बँगलोर एअरपोर्टवर देशाची सेवा करणारा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संदीप पोटे यांनी विद्यार्थ्याना देशसेेवेबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी सैनिक अक्षय गिते व संदीप पोटे यांना शाळेतील मुलींनी राख्या बांधल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा