क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार
सन 2021-22
शिक्षकाचे नाव (आडनाव प्रथम ) - श्री. अडसूळ तुकाराम तुळशिराम
शैक्षणिक ,व्यावसायिक पात्रता - एम. ए. डी.एड. डी.एस.एम., एम.एस.सी.आय. टी.
पदनाम :- उपाध्यापक
शाळेचे नाव व पत्ता – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जिल्हा - अहमदनगर
एकूण सेवा - 25 वर्ष 8 महिने
मोबाईल नं – 7588168948 / 9518309026
ई मेल आय डी - tukaramadsul@gmail.com
शिक्षकाने केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती - ( फक्त ठळक बाबीचा उल्लेख करावा)
1) लोकसहभागातून शाळा दुरुस्ती ,रंगकाम ,पेंटिंग, डिजिटल , संगणक लॅब तयार करून विद्यार्थ्यांसाठी विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या. शाळेचा कायापालट केला.
2) कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी सुरुवातीपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्कृष्टपणे चालू ठेवले.
3) कोरोना काळात शाळेतील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर घेऊन कोरोनाची भीती दूर केली.
4) ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापनासाठी विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्याचा प्रभावीपणे वापर केला तसेच इतरांना मार्गदर्शनासाठी स्वतःच्या यू ट्यूब चॅनलवर व ब्लॉगवर विविध प्रकारचे ई साहित्य, उपक्रम उपलब्ध केले आहेत.
5) पाठ्यपुस्तकातील विविध घटकांचे अध्यापन करताना विविध बाबींना प्रत्यक्ष भेटी देवून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
6) अध्ययन अध्यापनात विविध ॲपचा प्रभावीपणे वापर करून विद्यार्थ्याना कृतियुक्त आनंददायी शिक्षण दिले.
7) कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविली. विद्यार्थी नेहमी विविध पुस्तकांचे वाचन करतात. शासनाने या उपक्रमाची राज्य पातळीवर दखल घेवून जीवन शिक्षण मासिकात प्रसिद्धी दिली.
8) पाठ्यपुस्तकातील लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला, परदेशातील व्यक्तींशी शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान बाबत जनजागृती, शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक घेतले. कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केले.
9) पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण नवोपक्रम राबवून शाळेत निसर्गरम्य आनंददायी वातावरण निर्माण केले. या उपक्रमात विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा कृतिशील सहभाग घेतल्यामुळे ते नेहमी पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण करतात. शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला.
10) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण संमेलन व पर्यावरण संमेलन आयोजित करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
11) तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून पटसंख्या वाढली. गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला.
12) राज्यपातळीवर विविध शैक्षणिक बाबींमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले.
13)कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
14) AINET च्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये एकूण तीन रिसर्च पेपर चे सादरीकरण केले असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले.
15) SCERT आयोजित विविध ऑनलाइन उपक्रमात विद्यार्थी सहभाग 100 टक्के आणि स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन राज्यातील इतर विद्यार्थ्यांना कृतीशील मार्गदर्शन केले.
शिक्षकाची स्वाक्षरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा