देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांचेशी पर्यावरण संमेलन बाबत चर्चा करताना राज्याचे मा.शिक्षण संचालक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांचा विषय
देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांचेशी पर्यावरण संमेलन बाबत चर्चा करताना राज्याचे मा.शिक्षण संचालक आदरणीय दिनकर टेमकर साहेब यांचा विषय निघाला.कारण टेमकर साहेब कोठेही असले तरी राष्ट्रहितासाठी पर्यावरण संमेलनसाठी येतात.उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.आदरणीय आण्णांनी टेमकर साहेब यांचे कसे चालले आहे अशी आपुलकीने विचारपूस केली.तेव्हा टेमकर साहेब सेवानिवृत्त झाले तरीही शिक्षण आणि पर्यावरण बाबत उत्कृष्ट कार्य करत आहेत असे आण्णांना सांगितले.आण्णांनी त्यांचे कार्य पाहिले अनुभवले आहे.आण्णांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले. चांगले काम करतात.राळेगण सिद्धी येथे वेळोवेळी पर्यावरण संमेलनसाठी आले होते.आता साहेब काय करतात ,कोठे राहतात ,ते कसे आहेत ,अशी आपुलकीने विचारपूस केली.आदरणीय अण्णांना डॉक्टरांनी सध्या बेड रेस्ट सांगितलेली आहे.तरीही आदरणीय आण्णा चांगल्या कार्यासाठी वेळ देतात. आण्णांना खूप खूप धन्यवाद , तसेच आपले चांगले कर्म हीच आपली संपत्ती आहे.हे आदरणीय टेमकर साहेब यांच्यात दिसून येते. असे अनेकजण बोलताना मला दिसून आले.असे उत्कृष्ट अधिकारी शिक्षण विभागाला भेटले हे एक भाग्य आहे.कितीही लिहिले तरी कमी आहे.परंतु टेमकर साहेब मात्र अनेकांच्या हृदयात आहेत.साहेबांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा