राष्ट्रीय शिक्षण संमेलनात डॉ. नेहा बेलसरे,डॉ. गीतांजली बोरुडे,डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांचे कृतिसंशोधन व नवोपक्रम बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन
अहमदनगर - एटीएम परीवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गीतांजली बोरुडे ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर क्षीरसागर यांनी नवोपक्रम आणि कृतिसंशोधन बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.एटीएम परिवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन १४मे ते१५ मे २०२२ रोजी पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती ताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या संमेलनात राज्यातील कृतिशील शिक्षक विविध जिल्ह्यातून आले होते. या शिक्षकांना कृतिसांशोधन व नवोपक्रम बाबत मार्गदर्शन करताना डॉ.प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की आपण आपल्या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व कृतीसंशोधन राबवित असतो.संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी एखाद्या विषयाचा केलेला पद्धतशीर अभ्यास.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करावी लागते.शिक्षणातील विविध समस्या सोडविण्यासाठ...