आदरणीय मॅडम - यांच्या बद्दल थोडी माहिती - या आहेत नवी दिल्ली येथील सरकारी शाळेतील महान शिक्षिका मनू गुलाटी.त्या दिल्ली सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या mentor आहेत.दोन वर्षापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प हे भारत भेटीवर आले होते.त्यावेळी त्यांना एक शाळा पहायची होती.त्यानुसार नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मनू गुलाटी यांची सरकारी शाळा व त्यांच्या वर्गाची निवड करण्यात आली.त्यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी पंधरा दिवस त्यांच्या वर्गात जावून पूर्वतयारी करत होते. मेलानिया ट्रंप यांची शाळा भेट फक्त अर्धा तास होती परंतु मनू गुलाटी यांच्या Activity , उपक्रम ,वर्गतयारी ने प्रभावित होवून त्या तीन तास त्यांच्या वर्गात ,शाळेत थांबल्या व पाहणी करून त्यांनी मनू गुलाटी यांचे विशेष अभिनंदन केले.अमेरिकेत गेल्यावर त्यांनी तसे ट्विट केले.त्यांच्या कार्याचा फायदा आम्हा सर्व शिक्षकांना व्हावा म्हणून त्यांना संमेलनात मार्गदर्शन करण्यास निमंत्रित केले होते.त्यांनी अतिशय उत्कृष्ट कृतिशील मार्गदर्शन केले.वर्गात नेहमी शिक्षणाला पूरक असे आनंददायी वातावरण असले पाहिजे.संमेलन संपल्यावर त्या दिल्लीला गेल्यावर सर्व फोटो मागितले होते.त्यांचे सर्व फोटो पाठवले. त्यांच्या शाळा चालू आहेत , दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर त्यांनी फोन करून तुम्ही ,नेहा ताई ,प्रभाकर क्षीरसागर,टेमकर साहेब यांचे विषयी अधिक माहिती घेतली. त्यांना या संमेलन बाबत ड्राफ्टींग करायचे होते.त्यांना फोन नंबर फक्त टेमकर साहेबांचा दिला.साहेब दोन दिवस आमच्या बरोबर संमेलनात होते.साहेबांना त्यांच्या कार्याची ओळख झाली होती.तीन महिन्यातून एकदा आपण विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम ,गुणवत्ता वाढ यासाठी शिक्षकांची ऑनलाईन मीटिंग घेत जाऊ असे त्या म्हणाल्या.त्यांना महाराष्ट्रातील संस्कृती अतिशय आवडली.तुम्ही सर्वजण काय काय भाषण करत होते ते त्यांनी फोन वर विचारले.तसेच तुम्ही सर्वजण आम्हा शिक्षकांना वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करत आहात व पुढेही करत रहाल अशी विनंती ,तुम्हा सर्वांना धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा