राष्ट्रीय शिक्षण संमेलनात डॉ. नेहा बेलसरे,डॉ. गीतांजली बोरुडे,डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांचे कृतिसंशोधन व नवोपक्रम बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन
अहमदनगर - एटीएम परीवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गीतांजली बोरुडे ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर क्षीरसागर यांनी नवोपक्रम आणि कृतिसंशोधन बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.एटीएम परिवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन १४मे ते१५ मे २०२२ रोजी पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती ताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या संमेलनात राज्यातील कृतिशील शिक्षक विविध जिल्ह्यातून आले होते.
या शिक्षकांना कृतिसांशोधन व नवोपक्रम बाबत मार्गदर्शन करताना डॉ.प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की आपण आपल्या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व कृतीसंशोधन राबवित असतो.संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी एखाद्या विषयाचा केलेला पद्धतशीर अभ्यास.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करावी लागते.शिक्षणातील विविध समस्या सोडविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय.नवोपक्रम व शैक्षणिक संशोधन यामुळे आपल्या शाळेची गुणवत्ता वाढेल.आपण केलेल्या कृतिसंशोधन स्वतः पुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग राज्यातील सर्व शिक्षकांना झाला पाहिजे.
यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.गीतांजली बोरुडे यांनी सांगितले की नवोपक्रमात समस्या नसते . नवोपक्रममध्ये नाविन्यता असते.कृतिसंशोधन मध्ये समस्या सोडवणे आवश्यक असते. नवोपक्रमशिल शिक्षक सतत नवीन वाटा ,कल्पकता शोधत असतो.आपली समस्या शंभर टक्के सोडवावी लागते. कृतिसंशोधन ही स्वतःच एक पद्धती आहे.अनेक शिक्षक नवोपक्रम व कृतीसानशोधन करत असतात. कोरोना काळात शिक्षकांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आलेली समस्या सोडविण्याचे महत्वाचे काम केले.शिक्षक हा एक नवोपक्रमशिल व संशोधक असतो.
यावेळी मार्गदर्शन करताना उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी सांगितले की या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात नवोपक्रम व कृतिसंशोधन हा महत्वाचा विषय घेतला.आपल्याला येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ,शास्त्रशुद्ध पद्धतीने समस्या सोडवण्यासाठी प्रयोग करण्याची सर्जनशीलता हा दृष्टिकोन दिसतो. कृतिसंशोधन ही आनंददायी कृती आनंददायी कृती विद्यार्थ्यांमध्ये कृतीतून विकसित करावयाची असते.कृतिसंशोधनातील समस्या ही स्वतःला भेडसावणारी असते.तिच्या मुळापर्यंत जावून ती समस्या आपल्याला सोडवावी लागते.समस्या सोडवताना किंवा नवोपक्रम करताना काही अडचणी ,अडथळे येतात त्यावर आपल्याला उपाययोजना करावी लागते.मुलांचे शिक्षणे आनंददायी होण्यासाठी कृतिशोधन व नवोपक्रम उपयुक्त असतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा