मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षण परिषद

   ऑनलाईन शिक्षण परिषद           केंद्र -चिचोंडी       शनिवार दिनांक -२६/२/२०२२        वेळ - १२  ते ४             नियोजन  १)उपस्थिती व प्रस्तावना-- १२.०० ते १२.१० २)अवांतर वाचन -(भाषा )-१२.१० ते १२.५०-ज्ञानदेव   गायकवाड -शाळा मोकातेवस्ती ३)क्षेत्रभेटीचे महत्व--१२.५० ते१.३०--तुकाराम अडसूळ - शाळा गितेवाडी ४)लेखन कौशल्य (इंग्रजी)--१.३० ते २.१०--सुनील शिंदे -शाळा तागडमुळेवस्ती. ५) थोर भारतीय गणिती-२.२० ते ३--बंडू नागरगोजे -  शाळा तुपेवस्ती  ६)शालाबाह्य मुलविरहीत केंद्र नियोजन व उपाययोजना --३ ते  ३.४०--भगवान फसले  ७) पुस्तक परिचय -३.४० ते ४ --दिपश्री वाघ -शाळा शिराळ  -

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)च्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी किरण केंद्रे यांची निवड

अहमदनगर-कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM परिवाराचे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगर येथे संपन्न होत आहे.या राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी पाठ्यपुस्तक मंडळातील किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक व साहित्यिक किरण केंद्रे यांची निवड करण्यात आल्याची माहिती ATM परिवाराचे राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ सर यांनी दिली आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात  कृतिशील  शिक्षकांचा समूह (ATM परिवार)  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमी  अविरतपणे कार्य करत आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ATM परिवारमार्फत राज्यात विविध  प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.त्यासाठी ATM परिवाराच्या वतीने राज्यातील शिक्षकांना विविध उपक्रमातून मार्गदर्शन करून प्रेरणा दिली जाते.प्रेरणा द्या व प्रेरणा घ्या ,आपण सर्व एक आहोत  या सेवाभावी वृत्तीने राज्यात ATM परिवार नेहमी कार्य करत आहे.या उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणजे ...

इंटरनॅशनल कॉन्फरन्स

🙏इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रेझेन्टेशन     🙏             जगातील विविध देशातील शिक्षकांसाठी AINET ,अमेरिकन दूतावास ,ब्रिटिश कोन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.यामध्ये विविध देशातील इंग्रजी विषयातील उपक्रमशील शिक्षक कृतिशील सहभाग घेतात.दोन वर्षांपासून  या कॉन्फरन्स मध्ये कृतिशील सहभागी होण्याची संधी मिळत आहे . दोन वर्षांपूर्वी पोस्टर प्रेझेन्टेशनबाबत हैद्राबाद येथे  इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी  शासनाने पाठवले होते.  यावर्षी 8 व 9 जानेवारी 2022 रोजी  झालेल्या ऑनलाईन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये  जगातील विविध देशातील शिक्षकांसमोर माझी इंग्रजी विषयामधील एका घटकावर  इंग्रजीतून पेपर प्रेझेन्टेशन करण्यासाठी निवड झाली होती. या प्रेझेंटेशनबद्दल  AINET च्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.    Feeling happy...... Thank you so much Aainet for the great opportunity to present my paper on this international platform among the teachers fr...

आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज-तुकाराम अडसूळ

अहमदनगर-आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष व पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.अहमदनगर कॉलेज अहमदनगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिरात सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना "पर्यावरण जागृती" या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. हे शिबीर नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे हे दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासून २० डिसेंबर २०२१  पर्यंत आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध  क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित केले होते.तुकाराम अडसूळ यांनी या शिबिरात पर्यावरण म्हणजे काय ?पर्यावरण संवर्धन का कराव...

राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा गौरव

अहमदनगर--निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण निवारण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ डिसेंबर २०२१ ते २६ डिसेंबर २०२१  रोजी झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात समारोप कार्यक्रमामध्ये  पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल पद्मश्री राहीबाई पोपेरे ,पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनास शिर्डी येथील साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत ,राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर , पद्मश्री राहीबाई पोपेरे ,अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने , पर्यावरण मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रमोद मोरे ,नदीजोड प्रकल्पाचे राज देशमुख ,केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे ,स्वच्छ भारत मिशनचे प्र...

हिवाळी शिबिरात पर्यावरण जागृती मार्गदर्शन

आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज  -- तुकाराम अडसूळ        अहमदनगर-आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष व पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.अहमदनगर कॉलेज अहमदनगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने  टाकळी काझी येथे आयोजित  हिवाळी शिबिरात सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. हे शिबीर नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे हे दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासून २० डिसेंबर २०२१  पर्यंत आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या हिवाळी शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध  क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित के...

आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करा-तुकाराम अडसूळ

अहमदनगर-आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष व पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.अहमदनगर कॉलेज अहमदनगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने  टाकळी काझी येथे आयोजित  हिवाळी शिबिरात सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. हे शिबीर नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे हे दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासून २० डिसेंबर २०२१  पर्यंत आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या हिवाळी शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध  क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित केले होते.तुकाराम अडसूळ यांनी या शिबिरात पर्यावरण म्हणजे काय ?पर्यावरण संवर्धन का करावे?पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि प...