अहमदनगर-आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष व पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.अहमदनगर कॉलेज अहमदनगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने टाकळी काझी येथे आयोजित हिवाळी शिबिरात सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. हे शिबीर नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे हे दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासून २० डिसेंबर २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या हिवाळी शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित केले होते.तुकाराम अडसूळ यांनी या शिबिरात पर्यावरण म्हणजे काय ?पर्यावरण संवर्धन का करावे?पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि प्रदूषण निवारण कसे करावे ? पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही जबाबदारी कोणाची ? याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना या शिबिरात सविस्तरपणे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना " पर्यावरण जागृती "बाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की आपल्या सभोवती असणाऱ्या सजीव व निर्जीव घटकांचा समावेश पर्यावरणात होतो. हवा ,पाणी ,अन्न ,निवारा या आपल्या व इतर सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.या आपल्या गरजा परिसरातून पूर्ण होतात.आपला परिसर म्हणजे पर्यावरण होय.ज्या परिसरातून आपल्या गरजा पूर्ण होतात त्या परिसराचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे ,प्रदूषण वाढत आहे.आज पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. हवा ,पाणी ,अन्न यांपैकी एका घटकाचे जरी प्रदूषण झाले तरी आपल्याला व इतर सजीवांच्या जीवनास धोका निर्माण होतो.आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे.पर्यावरणाची रक्षा म्हणजे जीवनाची सुरक्षा होय. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषमुक्त सण समारंभ साजरे करणे ,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे , कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ,ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यापासून खत तयार करणे ,पाणी प्रदूषण रोखण्यासाठी पाण्यात कचरा टाकू नये ,पाण्यात सांडपाणी किंवा दूषित पाणी सोडू नये ,तसेच पाणी हे जीवन आहे असे आपण म्हणतो , पाण्याचा वापर जपून करणे ,अन्न प्रदूषण थांबविण्यासाठी अन्नात भेसळ करू नये ,शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे ,सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत .त्यामुळे राष्ट्र व समाजहितासाठी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात शिक्षणाबरोबर विविध उपक्रमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अशी मूल्य रुजणे आवश्यक आहे.आपण सर्वजण मिळून प्रदूषणमुक्त भारत निर्माण करूया असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी हे हिवाळी शिबीर आयोजन करणारे प्रा. डॉ.अशोक घोरपडे , प्रा.डॉ.शरद बोरुडे ,प्रा. डॉ.गोकुळदास गायकवाड ,प्रा.डॉ.मालती येवला ,प्रा. डॉ.निशा गोडसे ,शिक्षक सुनील शिंदे उपस्थित होते.या शिबिरात " पर्यावरण जागृती "या विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी तुकाराम अडसूळ यांना विशेष पत्र देऊन आभार मानले आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा