राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा गौरव
अहमदनगर--निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण निवारण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ डिसेंबर २०२१ ते २६ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात समारोप कार्यक्रमामध्ये पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल पद्मश्री राहीबाई पोपेरे ,पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनास शिर्डी येथील साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत ,राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर , पद्मश्री राहीबाई पोपेरे ,अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने , पर्यावरण मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रमोद मोरे ,नदीजोड प्रकल्पाचे राज देशमुख ,केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे ,स्वच्छ भारत मिशनचे प्रभाकर तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती राहून त्यांनी पर्यावरण बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही एक फार मोठी जागतिक समस्या आहे .आपल्याला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे.तुकाराम अडसूळ हे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाच्या आयोजनासाठी वेळोवेळी परिश्रम घेतात.या पर्यावरण संमेलनात राज्यातील शिक्षकांना व इतर क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत कृतिशील मार्गदर्शन केले जाते.सन २०१६ पासून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित केले जाते .या संमेलनाचे आयोजन ,नियोजन व कार्यवाही यामध्ये तुकाराम अडसूळ हे कृतिशील सहभाग घेतात. त्यांच्या पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याची दखल घेऊन त्यांची ५जून २०२१ पासून पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे यांनी त्यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणबाबत त्यांनी नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर आणि पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे शिक्षणाबरोबर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत विविध कृतिशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्र व समाजहिताचे मूल्य रुजविले.त्यांनी पर्यावरणपूरक शाळा तयार करून ग्रामस्थ व पालकांना पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवरणबाबत वेळोवेळी कृतिशील मार्गदर्शन केले.विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ हे पर्यावरणप्रेमी बनविले आहे.इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनाही वेळोवेळी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत कृतिशील मार्गदर्शन करतात.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत समाजात विविध ठिकाणी कृतिशील उपक्रम आयोजित करतात. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत जगात अग्रेसर असलेल्या भूतान देशात जाऊन त्यांनी तेथील पर्यावरणाचा विविध ठिकाणांना भेटी देऊन अभ्यास केला .भूतान देशातील भारतीय दुतावासमध्ये पर्यावरणबाबत विचार मांडण्याची संधी त्यांनी त्या देशातील भारताच्या दुतावासने त्यांना दिली होती .भूतान देशाप्रमाणे आपला भारत देश प्रदूषमुक्त झाला पाहिजे यासाठी ते परिश्रम घेत आहेत .च्या शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याची दखल घेऊन त्यांना विविध जागतिक ,राष्ट्रीय ,राज्य ,जिल्हा पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.राळेगणसिद्धी येथील पाचव्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनातील पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण मधील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.तुकाराम अडसूळ हे शिक्षणाबरोबर नेहमी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत राष्ट्र व समाजहितासाठी कार्य करत आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर नेहमी अभिनंदन करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा