मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री च्या योग शिक्षिका रचनाताई फासाटे यांचे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन योग प्राणायम शिबिर
अहमदनगर- मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या च्या योग टिचर रचनाताई फासाटे यांनी भारत देशातील आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक ,शिक्षिका ,अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर ११ मे २०२१पासून १६ मे २०२१ पर्यंत आयोजीत केले होते.या शिबिरात सुमारे ५०० शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंब सहभागी झाले होते.सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती व ऑक्सिजन पातळी वाढली पाहिजे.आपले आरोग्य निरोगी राहिले पाहिजे. .आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सध्या योग प्राणयामची अत्यंत आवश्यकता आहे .हा उद्देश समोर ठेवून मोरक्को देशातून योगा ट्रेनर रचनाताई सदाफुले / फासाटे यांनी झूम मिटिंगद्वारे हे योग प्राणायाम शिबिर दररोज एक तास असे सहा दिवस घेतले. या शिबिरात त्यांनी सर्व प्रकारच्या योग प्राणायाम बाबत आनंददायी व कृतिशील मार्गदर्शन करून शिक्षकांकडून हे योग प्राणायाम करून घेतले. या शिबिरात सर्वांनी आपल्या कुटुंबासह उस्फुर्त कृतिशील सहभाग घेतला .सर्वांना आरोग्यदायी फायदा झाला.
या शिबिरात अहमदनगर जिल्ह्याचे भूषण पद्मश्री पोपटराव पवार , महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद , जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चे डी.डी.
सुर्यवंशी , नेवासा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवाजी कराड , पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ ,शेवगावचे गटशिक्षणाधिकारी
रामनाथ कराड ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते एटीमचे राज्य संयोजक व शिक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता कमिटीचे सदस्य विक्रम अडसुळ ,
राज्य पुरस्कारप्राप्त शोभाताई पवार यांनी या शिबिरात कृतिशील सहभाग घेऊन शिबिरातील समारोपात उत्कृष्ट मार्गदर्शन करून अशा शिबीराची सध्या गरज असल्याचे सांगून या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. शिबिराचे आयोजन उपक्रशील शिक्षक तुकाराम अडसूळ ,राजू बनसोडे ,शुभांगी शेलार यांनी केले होते.या सामाजिक कार्याबद्दल योग शिक्षिका रचनाताई फासाटे यांचे भारतातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा