मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपे वाटप

वृक्षारोपनासाठी ग्रामस्थांना विविध झाडांची रोपे वाटप ,
शाळेचा उपक्रम झाला गावाचा उपक्रम

अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील  पर्यावरणप्रेमी शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेऊन  गितेवाडी येथील विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ यांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे घरोघरी जाऊन वाटप केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत .शाळा बंद असल्या तरी गितेवाडी येथील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे.या शिक्षणाबरोबर वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन हा उपक्रम नेहमी यशस्वीपणे राबविला जात आहे .त्यासाठी अनेक  कुटुंबाला पाच विविध प्रकारच्या झाडांची रोपे वाटप केली आहेत .उपक्रमशील शिक्षक  तुकाराम अडसूळ हे गितेवाडी येथील शाळेत जून २०१८ पासून बदलीने हजर झाल्यापासून शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम समाजहितासाठी नेहमी राबवितात.त्यासाठी ते दोन वर्षांपासून शाळेतील व गावातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ ,पालक यांच्या मध्ये वृक्षारोपन ,पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत जनजागृती करतात . त्यांना वृक्षारोपनासाठी दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार रोपे वाटून त्यांचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करून घेतात. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेतात .ते शाळेत राबवित असलेला हा पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम संपूर्ण गावाचा झाला आहे.विद्यार्थ्यांमध्ये   त्यांनी या नवोपक्रमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे व राष्ट्रहिताचे मूल्य यशस्वीपणे रुजविले आहे.विद्यार्थी वर्षभर विविध प्रसंगी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करतात. त्यांनी झाडांशी व निसर्गाशी मैत्री केली आहे . या नवोपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये योग्य परिवर्तन झाले आहे .ग्रामस्थ ,पालक हे वेळोवेळी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन करतात.तुकाराम अडसूळ यांच्या या पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याबद्दल अधिकारी ,पालक व ग्रामस्थ नेहमी अभिनंदन करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...