मुख्य सामग्रीवर वगळा

ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण

गितेवाडी  शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उत्कृष्ट शिक्षण

अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण चालू आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १७ मार्च २०२० पासून सुट्ट्या दिल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रभारी  मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ  यांनी उत्कृष्ट नियोजन व कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे  शिक्षण चालू ठेवले आहे.शाळेतील ८० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आहेत.
  शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये त्यांनी पालकांना गुगल मिट हे अँप डाऊनलोड करून देऊन या बाबत सवित्तर माहिती दिली.त्यानुसार गुगल मिटवर दररोज  विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करतात.विद्यार्थी ऑनलाईन तासाला वेळेवर जॉईन होतात .ज्यांना अँड्रॉईड फोन नाही त्यांना इतर विद्यार्थी मदत करून आपल्या घरी ऑनलाईन तासाला बोलावतात. यावेळी कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेतली जाते. विद्यार्थी  ऑनलाईन अध्यापनात कृतिशील सहभाग घेतात. ऑनलाईन अध्यापनात चर्चेत सहभागी होतात .प्रश्नांची उत्तरे देतात .दिलेला अभ्यास  वेळेत पूर्ण करतात.ऑनलाईन स्वाध्याय ,चाचणी सोडवतात . ऑनलाईन अध्यापनात यू ट्युबचा वापर केला जातो. शिक्षणाबरोबर विविध उपक्रम, स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले जाते. विविध ऑनलाईन उपक्रमात व स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात.विविध स्पर्धेत त्यांनी यश मिळवून त्यांना तशी प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
         तसेच गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण पद्धतीनेही उत्कृष्ट अध्यापन केले जाते. यामध्ये शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविला जातो.शिक्षक दररोज ऑनलाईन अध्यापन केल्यानंतर वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून अध्यापन करतात.ऑनलाईन तासाला दिलेला अभ्यास ,स्वाध्याय घरी जाऊन  तपासतात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका दिलेल्या आहेत.त्या विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत.शिक्षकांनी वेळोवेळी त्यांची तपासणी केली आहे.तसेच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके शिक्षक वेळोवेळी  विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन देतात.विद्यार्थी या पुस्तकांचे वाचन करतात.त्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात वाचन संस्कृती विकसित झाली आहे.तसेच ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबरोबर तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना व  ग्रामस्थांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे वाटून वृक्षारोपणाबाबत व प्रदूषण निवारण बाबत जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात.तसेच हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण होऊ देत नाहीत. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातून शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती झाली आहे. अधिकारी व पालकांनी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या कार्याचे  अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...