स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग ____________________________ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र वतीने आयोजित ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी कृतीशील सहभाग घेऊन स्वाध्याय सोडवतात.यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होण्यासाठी मदत झाली आहे .आठवड्यातून एकदा शनिवारी हा ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय येत असतो. यामध्ये भाषा ,गणित, विज्ञान या विषयांचा समावेश असतो. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न देऊन त्यासाठी चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे त्या उत्तराचा पर्याय क्रमांकावर क्लिक करावे लागते .विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोरोना काळापासून म्हणजे नोव्हेंबर 2020 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी स्वाध्याय उपक्रम सुरू केला तेव्हापासून यशवंतनगर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांनी हा उपक्रम त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविला .कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्या...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ