स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग
____________________________
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र वतीने आयोजित ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी कृतीशील सहभाग घेऊन स्वाध्याय सोडवतात.यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होण्यासाठी मदत झाली आहे .आठवड्यातून एकदा शनिवारी हा ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय येत असतो. यामध्ये भाषा ,गणित, विज्ञान या विषयांचा समावेश असतो. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न देऊन त्यासाठी चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे त्या उत्तराचा पर्याय क्रमांकावर क्लिक करावे लागते .विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोरोना काळापासून म्हणजे नोव्हेंबर 2020 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी स्वाध्याय उपक्रम सुरू केला तेव्हापासून यशवंतनगर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांनी हा उपक्रम त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविला .कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन या उपक्रमाबाबत कृतिशील माहिती देऊन स्वाध्याय उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याकडून सोडून घेतला. तसेच कोरोना नंतर शाळा सुरू झाल्यावर आठवड्यातून एकदा शाळेत हा स्वाध्याय उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याकडून सोडून घेतला. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे गट तयार केले व प्रत्येक गटाला या स्वाध्याय उपक्रमाची कृतिशील माहिती देऊन स्वाध्याय सोडून घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम होण्यास मोठी मदत झाली आहे. विद्यार्थी आनंदाने स्वाध्याय उपक्रम सोडवतात.या उपक्रमाबद्दल पालकांनी विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा