*शिकू आनंदे Learn with fun भाग 21*
दिनांक- 27 नोव्हेंबर 2021
*विषय- * कवायत,नृत्य,गीतगायन,आभूषण कला आणि रंगतदार प्रश्नांची मालिका*
*Integrate केलेले विषय - इंग्रजी,गणित, मराठी, विज्ञान,भूगोल कला, कार्या, शा.शि.*
आजचा शिकू आनंदे Learn with fun कार्यक्रम अगदी कृतीयुक्त आणि आनंददायी होता. आजची थीम संविधान दिन विशेष होती. यामध्ये शारीरिक हालचाली साहित्यासह कवायत,शेतकरी नृत्य,लोकनृत्य,संविधान उद्देशिका व संविधान गीतगायन,रेशमी बांगड्या,कर्णफुले,गळ्यातील दागिने आणि रंगतदार प्रश्नांची मालिका म्हणजेच fun time quiz time या संदर्भाने सादर झालेला भाग अतिशय उत्कृष्ट झाला. महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना कोविड काळात व कोविड काळानंतर शाळा सुरू झालेनंतर दप्तरमुक्त शनिवार असलेने शाळेत कृतीप्रवण ठेवून त्यांचे शिक्षण चालू ठेवल्याबद्दल
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , शिक्षक, पालक व विद्यार्थीमित्रांमुळे, त्यांच्या ऍक्टिव व उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली. सर्वांचे सादरीकरण खूप छान झाले.शिकू आनंदे च्या आजच्या भागात इयत्ता पहिली ते आठवीसाठी
यामध्ये शारीरिक हालचाली,साहित्यासह कवायत,शेतकरी नृत्य,लोकनृत्य,संविधान उद्देशिका व संविधान गीतगायन,रेशमी बांगड्या,कर्णफुले,गळ्यातील दागिने
आणि रंगतदार प्रश्नांची मालिका सादर करण्यात आली. शिकू आनंदे चा आजचा भाग म्हणजे सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक असे सेशन.
*शिकू आनंदे भाग 21 वा पाहण्यासाठी खालील दुवा वापरा*
*इयत्ता पहिली ते पाचवी साठी*
https://youtu.be/lOG_ef8Wbj0
*इयत्ता सहावी ते आठवीसाठी*
https://youtu.be/pHt_ELrxLBw
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा