*शुभविवाहात शाळेच्या ग्रंथालयास एक हजार पुस्तके वाटप..* ------------------- *पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यासाठी एक हजार झाडांची रोप वाटप... शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा प्रेरणादायी आदर्श निर्माण उपक्रम...!* ---------------- *आष्टी(अण्णासाहेब साबळे)* अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि त्यांच्या पत्नी उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे /अडसूळ यांनी आपली कन्या स्नेहलच्या शुभविवाहात लोकसहभाग म्हणजे मिशन आपुलकीतून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नऊ शाळांच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची एक हजार पुस्तके भेट देऊन राज्यात एक वेगळा उत्कृष्ट प्रेरणादायी उपक्रम राबिवला . ग्रंथालयाची ही पुस्तके महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण संचालक दिनकर टेमकर,राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडू...