*शुभविवाहात शाळेच्या ग्रंथालयास एक हजार पुस्तके वाटप..*
-------------------
*पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यासाठी एक हजार झाडांची रोप वाटप... शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा प्रेरणादायी आदर्श निर्माण उपक्रम...!*
----------------
*आष्टी(अण्णासाहेब साबळे)* अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि त्यांच्या पत्नी उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे /अडसूळ यांनी आपली कन्या स्नेहलच्या शुभविवाहात लोकसहभाग म्हणजे मिशन आपुलकीतून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नऊ शाळांच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची एक हजार पुस्तके भेट देऊन राज्यात एक वेगळा उत्कृष्ट प्रेरणादायी उपक्रम राबिवला . ग्रंथालयाची ही पुस्तके महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण संचालक दिनकर टेमकर,राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,छत्रपती संभाजीनगर डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.विशाल तायडे,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे,माजी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांचे हस्ते वाटप केली. अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणात लोकसहभागातून विविध सुविधा मिळण्यासाठी मिशन आपुलकी हा नवोपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत.या उपक्रमास प्रतिसाद देऊन उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व त्यांच्या पत्नी शिक्षिका संजना चेमटे /अडसूळ यांनी अहमदनगर येथील द्वारका लॉन येथे आपल्या कन्येच्या शुभविवाहात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यामधील ज्ञान आणखी वाढण्यासाठी अवांतर वाचनाची त्यांच्या आवडीची विविध प्रकारची एक हजार पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप केली.तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजण्यासाठी या शुभविवाहात लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व शिक्षिका संजना चेमटे/अडसूळ यांनी उपस्थितांना वृक्षारोपनासाठी विविध झाडांची सुमारे एक हजार रोपे वाटप केली.आपल्याला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे.पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.म्हणून हा जनहिताचा उपक्रमही राबविण्यात आला.या शुभविवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवरही तुकाराम अडसूळ यांनी समाजात वाचनाचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता.शुभविवाहात शाळांच्या ग्रंथालयास वाचनासाठी एक हजार पुस्तके व वृक्षारोपनासाठी एक हजार झाडांची रोपे वाटप केल्याबद्दल देशाचे थोर समाजसेवक पद्मभूषण आण्णासाहेब हजारे,महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,महाराष्ट्र राज्याचे भूषण पद्मश्री पोपटराव पवार,पाथर्डी शेवंगावच्या आमदार मोनिकाताई राजळे, पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके,राज्याचे मा.शिक्षण संचालक दिनकर टेमकर,राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस , भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे अमेरिकेतील ग्लोबलनगरी फौंडेशन अमेरिका चे संस्थापक अध्यक्ष डॉ .किशोर गोरे ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील,पद्मश्री पोपटराव पवार यांचे चिरंजीव प्रसन्ना पवार, अहमदनगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने, अहमदनगर जिल्ह्याचे विभागोय वनाधिकारी सचिन कंद,माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे,माजी शिक्षणाधिकारी पांडुरंग मगर यांनी शुभविवाह प्रसंगी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा संदेश देऊन अभिनंदन केले.तसेच शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी त्यांच्या गावातील मंदिरांच्या बांधकामासाठीही मदत केली.राज्यातील व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर , डायटचे अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , वर्तमानपत्रांचे संपादक, उपसंपादक,पत्रकार,विविध वाहिन्यांचे प्रतिनीधी,विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक ,शिक्षक बंधू भगिनी,ग्रामस्थ, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी,कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे सदस्य,उपस्थित सर्व मान्यवर यांनी याशैक्षणिक व सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षक तुकाराम अडसूळ व त्यांच्या पत्नी शिक्षिका संजना चेमटे /अडसूळ यांचे विशेष अभिनंदन केले.शुभविवाहात शाळेच्या ग्रंथालयास एक हजार पुस्तके वाटप आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यासाठी एक हजार झाडांची रोपे वाटप करून क्षेत्रात शिक्षक तुकाराम अडसूळ व त्यांच्या पत्नी संजना चेमटे /अडसूळ यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.अनेकांनी हा आदर्श घेण्याचे आवाहन केले.या उपक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे संयोजक उपक्रमशील आदर्श शिक्षक विक्रम अडसूळ व उपक्रमशील शिक्षक अनिल शिंदे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा