मुख्य सामग्रीवर वगळा

परिचय

तुकाराम तुळशिराम अडसूळ 
प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर

एकूण सेवा २६
 वषे

उल्लेखनीय कार्य
१)  विद्यार्थ्यांना लोकसहभागातून बेंचेस ,लाऊडस्पीकर ,संगणक  ,एल.ई. डी,सोलर ,सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य तसेच शाळा पेंटिंग करून डिजिटल केल्या.

२) शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गाचा निकाल नेहमी १०० टक्के लागला .त्याबद्दल सन २००६ मध्ये  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,सी.ई. ओ,उपाध्यक्ष ,शिक्षणाधिकारी यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले,

३) लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर ता.नगर  या शाळेचे परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली.  शाळेचा विद्यार्थी पट वाढला आठ शिक्षकी शाळा दहा शिक्षकी झाली ,गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला ,ग्रामसभेने अभिनंदनाचा ठराव घेतला ,
या शाळेला जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,सी.ई. ओ.,जिल्हा पोलीस अधीक्षक ,सिव्हिल सर्जन ,शिक्षणाधिकारी ,जिल्हा उपवनसंरक्षक अशा अनेक अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन  कार्याचे अभिनंदन केले.
४)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी शाळेचे लोकसहभागातून परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम शाळा व गाव पातळीवर राबविला ,राष्ट्रहितासाठी गुणवत्तेबरोबर 
पर्यावरणप्रेमी विद्यार्थी तयार केले,
५)जेऊर व गितेवाडी शाळा परिवर्तनासाठी स्वतःच्या वेतनातील काही रक्कम खर्च केली.
६)दिवाळीच्या सुट्टीत राज्यातील शिक्षकांसाठी पर्यावरण संवर्धनबाबत मार्गदर्शन करण्यासाठी  दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन घेण्यासाठी वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांच्या बरोबर परिश्रम घेतले.
सध्या प्रमोद दादा मोरे यांचे समवेत राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन ,पर्यावरण कार्यशाळा आयोजनासाठी कृतिशील सहभाग घेतात.

७ ) सन २०१८ मध्ये पर्यावरण अभ्यासासाठी भूतान देशात जाऊन आठ दिवस पर्यावरणाचा अभ्यास केला केला ,भूतान देशाची राजधानी थिंपु येथे भारतीय दूतावास मध्ये पर्यावरणाबाबत विचार मांडले ,

८)महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी ,तेरा कोटी व तेहतीस कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग घडवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाच्या वनविभागाच्या वतीने सतत तीन वर्षे विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

९)कोरोनाकाळात सुट्ट्या लागल्यापासून विद्यार्थ्यांचे गुगलमीटवर उत्कृष्ट ऑनलाईन अध्यापन केले तसेच गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन केले .
१०)व्हिडीओ कॉन्फरन्स व पाठयपुस्तकातील  लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

११) सन २०२० मध्ये स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरचा पर्यावरणाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

१२)पर्यावरणात करीत असलेल्या  कार्याबद्दल हिवरे बाजार येथील प्रयास फौंडेशन च्या वतीने २०१९ मध्ये पद्मश्री पोपट पवार साहेब यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

१३)नाशिक जिल्ह्यातील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मालेगाव येथे २०१९ मध्ये समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

१४)पर्यावरणात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन अनेक वेळा सन्मानित करण्यात आले.
 १५)शाळेतील विद्यार्थी  तालुका ,जिल्हा ,राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध  ऑनलाईन  स्पर्धेत  कृतिशील सहभाग घेऊन   यश मिळवितात .

१६)रोटरी क्लब अहमदनगर कडून २०१८ मध्ये जिल्हास्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात सला.

१७)२०२० मध्ये रोटरी क्लब मुंबई कडून राज्यस्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.

१८)जून २०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत अभ्यासक्रम मंडळावर निवड करण्यात आली.
१९)जून २०२१ मध्ये शाळा स्वछता कृती आराखड्यात संगमनेर डायट मध्ये तज्ञ मार्गदर्शन म्हणून निवड झाली.

२०)१०जुलै २०२१ रोजी शासनाच्या वतीने शिकू आनंदे या राज्यस्तरीय ऑनलाईन उपक्रमात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणावर ऑनलाईन मार्गदर्शन केले.
सध्याही महिन्यातून काहीवेळा राज्यातील विद्यार्थ्यांना  बालभारती पुणे येथून शासनाच्या वतीने विविध घटकांचे ऑनलाईन अध्यापन करून मार्गदर्शन करतात.
२१)जानेवारी २०२० मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत जगातील विविध देशातील शिक्षकांपुढे इंग्रजी विषयावर प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बाबत शासनाने निवड केली ,हैद्राबाद येथे जगातील विविध देशातील शिक्षकांपुढे  उत्कृष्ट प्रेझेंटेशन केले.
२२)२०१९मध्ये  नाशिक येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात राज्यातील शिक्षकांना शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत प्रेझेंटेशन केले.
२३) आतापर्यंत एकूण सहा पुस्तकांचे स्वतः लेखन करून ते राज्याचे शिक्षण संचालक यांचे हस्ते प्रकाशित केले आहे .
24) ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद अहमदनगर यांचे वतीने आयोजित जिल्हास्तरीय साईज्योती प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल  विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

25) कोरोनाकाळापासून ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा  निरंतर वाचन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविली आहे.
सुट्टीतही हा उपक्रम राबविला जातो.
या उपक्रमाची शासनाने दखल घेऊन तो शासनाच्या जीवन शिक्षण मासिकात प्रसिद्ध केला.

26) गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.

27)शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2021-22 मध्ये जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

28)शिक्षण व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2022-23 मध्ये शासनाचा राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.


29) शिक्षण व पर्यावरण कार्याबद्दल विविध संस्थांचे जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

कोरोनाकाळातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण

 कोरोना काळातील माझे ऑनलाईन शिक्षण डिसेंबर२०१९ मध्ये चीनच्या वूहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना आपल्या देशात आपल्या पर्यंत  येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.अखेर आपल्या राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतरा मार्चपासून सुट्ट्या दिल्या नंतर लॉक डाऊन केले.शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे आम्ही  दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू केले.पालकांशी चर्चा करून लगेच त्यांचे व्हाट्सएप चे ग्रुप तयार केले.या ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला हे ऑनलाईन शिक्षण चालू केले.ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन होते त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरू असे पण ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नव्हते त्यांना फोन करून  अभ्यास दिला.असे आमचे ऑनलाईन शिक्षण सुरुवातीला सुरू झाले.    मात्र जून पासून यामध्ये बदल करून प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन करण्याचे ठरवले.त्यानुसार पुन्हा पालकांशी चर्चा करून त्यांना गुगल मीट हे अँप डाऊनलोड करून दिले.ज्यांच्या कडे अँड्रॉईड फोन नाही त्यांना आपल्या जवळ ,शेजारी राहत असलेल्या मुलांना कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन मद...