मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परिचय

तुकाराम तुळशिराम अडसूळ  प्राथमिक शिक्षक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर एकूण सेवा २६  वषे उल्लेखनीय कार्य १)  विद्यार्थ्यांना लोकसहभागातून बेंचेस ,लाऊडस्पीकर ,संगणक  ,एल.ई. डी,सोलर ,सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य तसेच शाळा पेंटिंग करून डिजिटल केल्या. २) शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गाचा निकाल नेहमी १०० टक्के लागला .त्याबद्दल सन २००६ मध्ये  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,सी.ई. ओ,उपाध्यक्ष ,शिक्षणाधिकारी यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले, ३) लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर ता.नगर  या शाळेचे परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली.  शाळेचा विद्यार्थी पट वाढला आठ शिक्षकी शाळा दहा शिक्षकी झाली ,गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला ,ग्रामसभेने अभिनंदनाचा ठराव घेतला , या शाळेला जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,सी.ई. ओ.,जिल्हा पोलीस अधीक्षक ,सिव्हिल सर्जन ,शिक्षणाधिकारी ,जिल्हा उपवनसंरक्षक अशा अनेक अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन  कार्याचे अभिनंदन केले. ४)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता....

पर्यावरण उपक्रम

उपक्रम-  हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी - प्रदूषमुक्त सणसमारंभ साजरे करणे , वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे , वाढदिवसाच्या दिवशी झाडाचे रोप भेट देणे, सार्वजनिक कार्यक्रमात अनावश्यक खर्च टाळून  झाडांची रोपे वाटप करणे ,  आपण विविध फळे खातो अशा विविध बियांचा संग्रह करून  घरच्या घरी रोप तयार करणे ,झाडांचे वाढदिवस साजरे करणे, सायकलचा वापर करणे ,पाठयपुस्तकातील विविध पाठांवर आधारित परिसर व क्षेत्रभेट आयोजित करून प्रत्यक्ष अनुभव देणे, परिसराचे रक्षण करून परिसर स्वच्छ ठेवणे ,,,,,,असे अनेक  पाणी प्रदूषण रोखण्यासाठी- पाण्यात कचरा टाकू नये , कचऱ्यापासून खत निर्मिती करणे , पाण्याचा गैरवापर करू नये , पिण्याचे पाणी झाकून ठेवणे, पाणी पुरवठा क्षेत्रभेट , पाण्यात सांडपाणी सोडू नये त्यासाठी शोषखड्डा घेणे त्याशेजारी एक झाड लावणे , दूषित पाणी नदीत ओढ्यात सोडू नये ,,,,,असे अनेक  अन्न प्रदूषण रोखण्यासाठी-आहारात सकस आहार असावा ,अन्नात भेसळ करू नये,उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे ,  सेंद्रिय परसबाग निर्मिती करणे , सेंद्रिय भाजीपाला बाजार आयोजित करणे,आहारात पालेभाज्या वापर करणे,  ...