उपक्रम-
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी - प्रदूषमुक्त सणसमारंभ साजरे करणे ,
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे ,
वाढदिवसाच्या दिवशी झाडाचे रोप भेट देणे, सार्वजनिक कार्यक्रमात अनावश्यक खर्च टाळून झाडांची रोपे वाटप करणे ,
आपण विविध फळे खातो अशा विविध बियांचा संग्रह करून घरच्या घरी रोप तयार करणे ,झाडांचे वाढदिवस साजरे करणे,
सायकलचा वापर करणे ,पाठयपुस्तकातील विविध पाठांवर आधारित परिसर व क्षेत्रभेट आयोजित करून प्रत्यक्ष अनुभव देणे,
परिसराचे रक्षण करून परिसर स्वच्छ ठेवणे ,,,,,,असे अनेक
पाणी प्रदूषण रोखण्यासाठी-
पाण्यात कचरा टाकू नये ,
कचऱ्यापासून खत निर्मिती करणे ,
पाण्याचा गैरवापर करू नये ,
पिण्याचे पाणी झाकून ठेवणे,
पाणी पुरवठा क्षेत्रभेट ,
पाण्यात सांडपाणी सोडू नये त्यासाठी शोषखड्डा घेणे त्याशेजारी एक झाड लावणे ,
दूषित पाणी नदीत ओढ्यात सोडू नये ,,,,,असे अनेक
अन्न प्रदूषण रोखण्यासाठी-आहारात सकस आहार असावा ,अन्नात भेसळ करू नये,उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे ,
सेंद्रिय परसबाग निर्मिती करणे ,
सेंद्रिय भाजीपाला बाजार आयोजित करणे,आहारात पालेभाज्या वापर करणे,
जास्त तेलकट व जास्त मसाल्याचे पदार्थ खाणे टाळावे ,
शिळे अन्न खाऊ नये,
शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे , शिल्लक अन्न कोठेही टाकू नये ,
प्लॅस्टिकमुक्त शाळा गाव ,
स्वच्छता मॉनिटर उपक्रम ,
स्वच्छ सुंदर वर्ग ,शाळा ,गाव ,
,,,,,असे अनेक
परिसरातून अन्न मिळते म्हणून विविध पिकांना भेटी देऊन माहिती घेणे,
तसेच पशुपक्षासाठी आपल्या घराजवळ चारापाणी ठेवणे ते पर्यावरण संवर्धनाचे कार्य करत असतात.
असे अनेक उपक्रम आपल्याला राबविता येतील.त्याबाबतचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविता येतील.
धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा