मुख्य सामग्रीवर वगळा

पंढरपूर

अहमदनगर   - एटीएम परीवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गीतांजली बोरुडे ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर क्षीरसागर यांनी नवोपक्रम आणि कृतिसंशोधन बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.एटीएम परिवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलन १४मे ते१५ मे २०२२ रोजी पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती ताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या संमेलनात राज्यातील कृतिशील शिक्षक विविध जिल्ह्यातून आले होते.
या शिक्षकांना कृतिसांशोधन व नवोपक्रम बाबत मार्गदर्शन करताना डॉ.प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की आपण आपल्या शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व कृतीसंशोधन राबवित असतो.संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी एखाद्या विषयाचा केलेला पद्धतशीर अभ्यास.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करावी लागते.शिक्षणातील विविध समस्या सोडविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय.नवोपक्रम व शैक्षणिक संशोधन यामुळे आपल्या शाळेची गुणवत्ता वाढेल.आपण केलेल्या कृतिसंशोधन स्वतः पुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग राज्यातील सर्व शिक्षकांना झाला पाहिजे.   

यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.गीतांजली बोरुडे यांनी सांगितले की नवोपक्रमात समस्या नसते . नवोपक्रममध्ये नाविन्यता असते.कृतिसंशोधन मध्ये समस्या सोडवणे आवश्यक असते. नवोपक्रमशिल शिक्षक सतत नवीन वाटा  ,कल्पकता  शोधत असतो.आपली समस्या शंभर टक्के सोडवावी लागते. कृतिसंशोधन ही स्वतःच एक पद्धती आहे.अनेक शिक्षक नवोपक्रम व कृतीसानशोधन करत असतात. कोरोना काळात शिक्षकांनी त्यांना  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आलेली समस्या सोडविण्याचे महत्वाचे काम केले.शिक्षक हा एक नवोपक्रमशिल व संशोधक असतो.

यावेळी मार्गदर्शन करताना उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी सांगितले की या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात नवोपक्रम व कृतिसंशोधन हा महत्वाचा विषय घेतला.आपल्याला येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ,शास्त्रशुद्ध पद्धतीने समस्या सोडवण्यासाठी प्रयोग करण्याची सर्जनशीलता हा दृष्टिकोन दिसतो. कृतिसंशोधन ही आनंददायी कृती आनंददायी कृती विद्यार्थ्यांमध्ये कृतीतून विकसित करावयाची असते.कृतिसंशोधनातील समस्या ही स्वतःला भेडसावणारी असते.तिच्या मुळापर्यंत जावून ती समस्या आपल्याला सोडवावी लागते.समस्या सोडवताना किंवा नवोपक्रम करताना काही अडचणी ,अडथळे येतात त्यावर आपल्याला उपाययोजना करावी लागते.मुलांचे शिक्षणे आनंददायी होण्यासाठी कृतिशोधन व नवोपक्रम उपयुक्त असतात.
या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,दिल्ली सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या मेंटॉर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका मनू गुलाटी,राजस्थान मधील शिक्षण तज्ञ इम्रान खान,केरळचे शिक्षण तज्ञ विधू नायर,लडाख येथील शिक्षण तज्ञ सोनम वांगचूक,,,,,अशा अनेक महान व्यक्तींनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात शिक्षकांनी आपल्या शाळेतील  उपक्रमांचे सादरीकरण केले तसेच यावेळी पोस्टर प्रदर्शन भरविले होते त्याबाबत शिक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात  एटीएम परिवारातील विक्रम अडसूळ ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम,ज्ञानदेव नवसरे ,तुकाराम अडसूळ ,ज्ञानेश्वर विजागत ,प्रशांत वाघमारे यांचेसह राज्यातील सुमारे चारशे शिक्षक बंधू भगिनी यांनी कृतिशील सहभाग घेतला.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...