आपल्या ATM परीवार मधील उपक्रमशील आदर्श शिक्षक अतिशय दुर्गम भागात अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे बाळासाहेब बोडखे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव ता.करमाळा जिल्हा सोलापूर यांनी काल राज्यातील एक आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देवून विविध बाबींची पाहणी केली.जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धन बाबत महान कार्य करत असलेले व हिवरे बाजार आदर्श गाव निर्माण करणारे पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचेशी संवाद साधून पर्यावरण बाबत चर्चा केली.पर्यावरण संवर्धनबाबत कोणकोणते उपक्रम शाळेत राबविले जातात असे पवार साहेबांनी बोडखे सर यांना विचारताच शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी त्यांच्या शाळेत राबविलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ,पर्यावरण संवर्धन उपक्रम मधून शाळा ,गाव बदलेले , विविध स्पर्धेत राज्य व ,राष्ट्रीय पातळीवर आलेले विद्यार्थी , गुणवत्तापूर्ण पर्यावरण पूरक शाळा ,विद्यार्थी ,ग्रामस्थांमध्ये राष्ट्रहितासाठी रुजवलेली पर्यावन संवर्धन बाबत मूल्य , दुर्गम भागातील शाळा आदर्श शाळा बनविल्या , कोरोना काळातील उत्कृष्ट शिक्षण , अतिशय उत्कृष्ट जीवन शिक्षण विद्यार्थ्याना ,,,,असे अनेक आपल्या पंढरपूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात मॉडेल स्कूल बाबत केलेले प्रेझेन्टेशन पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचेपुढे लॅपटॉपद्वारे सादरीकरण केले.यामधील प्रत्येक नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून पवार साहेब भारावून गेले.प्रत्येक उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.असे उपक्रम राबविले पाहिजे असे त्यांनी सांगून सुमारे एक तास वेळ देवून सर्व उपक्रम माहिती घेतली.बोडखे सरांच्या पाठीवर मोठ्या आनंदाने शाबासकीची थाप देवून सरांचा मोबाईल नंबर घेवून खादगाव शाळेला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.बोडखे सरांच्या नावीन्यपूर्ण समाजपयोगी महान कार्याची माहिती पवार साहेबांनी भेट देण्यासाठी आलेल्या आलेल्या लोकांना सांगितली.असे शिक्षक तयार झाले पाहिजेत, त्यामुळे आपला भारत देश आणखी पुढे जाईल असे सांगितले.आदर्श शाळा तयार झाल्या तर आदर्श गावे तयार होतील. बोडखे सरांचे कार्य राज्यातील इतर शिक्षकांना मार्गदर्शक आहेत असे सांगून त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देवून मोठा गौरव केला.कधीही अडचण आली तर फोन करा.बोडखे सरांनी पर्यावरणाबाबत राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे पुस्तक लेखन केले.या पुस्तकाची पवार साहेबांनी सविस्तर पाहणी केली.हे पुस्तक राज्यातील शिक्षकांना पर्यावरण कार्यासाठी प्रेरणादायी असेल. या पुस्तकास पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रस्तावना असणार आहे.यावेळी पवार साहेबांनी ATM परिवाराचे विविध कार्य समजून घेवून ATM परीवार अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम दादा अडसूळ सर आणि सर्व ATM परिवाराचे विशेष अभिनंदन केले. ATM अर्थात कृतिशील शिक्षक अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवित आहेत त्याबद्दल पवार साहेबांनी हे कार्य अतिशय अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा