खासदर.सुप्रियाताई सुळे यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच यांच्या कार्याबाबत पिपीटी द्वारे प्रेझेंटेशन करून सविस्तर माहिती दिली.तसेच 2 मे 2022 रोजी द्विशिक्षकी शाळा सक्षमीकरण बाबत राज्यस्तरीय शिक्षण परिषद मुंबई येथे सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनखाली होत आहे.याबाबत माहिती दिली.यावेळी खा सुप्रियाताई सुळे यांना शिक्षण क्षेत्रात शिक्षण विकास मंच आणि ATM परीवार यांच्या माध्यमतून माजी शिक्षण संचालक डॉ.वसंत काळपांडे साहेब आणि ATM परिवाराचे संयोजक विक्रम अडसूळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात चालू असलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती दिली.तसेच यावेळी शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण याविषयी शाळेत राबविलेल्या उपक्रमाबाबत पुस्तकाचे लेखन केले ते पुस्तक सुप्रियाताई सुळे यांना भेट दिले. त्यांनी या पुस्तकाबाबत सविस्तर माहिती घेवून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ