अहमदनगर -- पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना काळात उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी " ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी " हा वाचन उपक्रम यशस्वीपणे राबविला.या उपक्रमातून त्यांनी विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयास लोकसहभागातून पुस्तके दान करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.या उपक्रमामुळे जानेवारी २०२२ मध्ये वर्षश्राध्दच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेस लोकसहभागातून कैलास गिते आणि चांगदेव गिते यांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमात गितेवाडी शाळेला विद्यार्थ्यांच्या आवडीची विविध प्रकारची अशी सुमारे शंभर पुस्तके लोकसहभाग म्हणून गितेवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचेकडे सुपूर्द केली.
. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी या उपक्रमाबद्दल विशेष अभिनंदन केले.असे उपक्रम सार्वजनिक कार्यक्रमात राबविले पाहिजेत असे अनेकांनी सांगितले. शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके दान केल्याबद्दल शिक्षक मोतुकाराम अडसूळ यांनी कैलास गिते ,चांगदेव गिते यांचे आभार मानले आणि या उपक्रमाची उपस्थित सर्वांना माहिती दिली. आज सोशल मिडियाच्या जगात वाचन संस्कृती कमी होताना दिसते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ,त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.विद्यार्थ्यांच्या आवडीच्या पुस्तकांचे प्रदर्शन वेळोवेळी भरविले.यामधून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अनेक प्रकारची त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून दिली.यासाठी स्वतः अनेक पुस्तके खरेदी करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले.त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.एका आठवड्यात दोन पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली.त्यांच्याबरोबर घरातील इतरांनीही ही पुस्तके वाचली.त्यांच्यामध्ये वाचनाबाबत जनजागृती केली. त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती रुजली.शाळेचा उपक्रम घराघरात जावून तो गावाचा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांच्या जीवनाची योग्य जडणघडण होण्यासाठी , त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ,उद्याचे साहित्यिक ,विचारवंत ,लेखक ,कवी, विद्यार्थ्यांमधून निर्माण होण्यासाठी ,देशाचे सुजान नागरिक तयार होण्यासाठी हा उपक्रम राबविला असून तो कायमस्वरूपी राबविला जात आहे असे उपक्रमशिल शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले .या उपक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दखल घेवून जानेवारी २०२२ मध्ये जीवन शिक्षण मासिकात हा उपक्रम प्रसिद्ध केला आहे.त्यांनी याबद्दल शिक्षक तुकाराम अडसूळ यांना चारशे रुपये मनीऑर्डर पाठविली.या मनी ऑर्डरचा विनियोग त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके घेण्यासाठी केला. कोरोणा कमी झाल्यावर शाळा नियमितपणे सध्या चालू आहेत .हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी शिक्षक तुकाराम अडसूळ हे आता वेळोवेळी शाळेतही विद्यार्थ्याना वाचनासाठी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवितात.त्यामधून विद्यार्थी अनेक पुस्तकांचे वाचन करत आहेत.या वाचलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थी माहिती सांगतात.या उपक्रमाबद्दल पालक ,ग्रामस्थ ,केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी ,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा