अहमदनगर -- पाथर्डी तालक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी इंटरनॅशनल इंग्रजी कॉन्फरन्स मध्ये इंग्रजी विषयातील रिसर्च पेपरचे ऑनलाईन प्रेझेंटेशन केले. आयनेट असोसिएशन ऑफ इंग्लिश टीचर्स ,ब्रिटिश कौन्सिल , यू. एस. अंबेसी,रेलो ,इंडिया , ए.टी.एम .यांचे संयुक्त विद्यमाने ७ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत इंटरनॅशनल इंग्रजी कॉन्फरन्स ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.या कॉन्फरन्स मध्ये ८जानेवारी २०२२ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी इंग्रजी विषयावर गितेवाडी येथील शाळेत राबविलेले कृतिसंशोधन बाबत उत्कृष्टपणे ऑनलाईन प्रेझेंटेशन केले.हे प्रेझेंटेशन डेव्हलपमेंट ऑफ रिडिंग स्किल्स यूजिंग डिफ्रंट टूल्स या विषयावर केले.शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयातील वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रकारच्या कृतींची कार्यवाही यशस्वीपणे केली.यामध्ये या कृतिशोधनाची उद्दिष्टे ,नियोजन ,कार्यवाही , विविध कृती , शैक्षणिक साहित्य ,निष्पत्ती,निष्कर्ष , अडचणी ,संदर्भ साहित्य ,सारांश ,,, अशा अनेक बाबींचा समावेश होता. या कृतिसंशोधनातून उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयातील वाचन कौशल्य विकसित केले. विद्यार्थ्यामधील इंग्रजीची भीती दूर होवून त्यांना इंग्रजी वाचन येवू लागले , इंग्रजीबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढला.त्यांना इंग्रजी वाचनाची गोडी निर्माण झाली.या कॉन्फरन्समध्ये भारतातील अनेक उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या रिसर्च पेपरचे कृतिशील सादरीकरण केले. यावेळी भारतातील व जगातील विविध देशातील अनेक उपक्रमशिल शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.या रिसर्च पेपर प्रेझेंटेशन बद्दल उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना आयनेटच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. याबद्दल उपक्रमशिल शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे आयनेटचे अध्यक्ष डॉ.विवेक जोशी , आयनेटचे सक्रेटरी डॉ.अमोल पदवाड ,डॉ.कृष्णा दीक्षित ,नदीम खान यांनी अभिनंदन केले.तसेच या रिसर्च पेपर प्रेझेंटेशन बद्दल उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर , राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे , अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा