अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी वर्षभर प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात असे या शाळेतील उपक्रमशील पर्यावरणप्रेमी शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे .या शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम कृतिशील पणेनेहमी राबविला जातो.कोरोनाकाळात हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट पणे राबविला गेला. हवा, पाणी ,अन्न या आपल्या व इतर सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत .यापैकी एका घटकाचे जरी प्रदूषण झाले तरी आपल्या जीवनाला धोका निर्माण होतो .म्हणून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही काळाची गरज आहे. राष्ट्र व समाजहितासाठी हा उपक्रम नेहमी राबवून विद्यार्थ्यांना त्याबाबत कृतिशील मार्गदर्शन केले जाते.त्यामुळे विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याची प्रतिज्ञा घेऊन प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात. दिवाळी हा खूप मोठा सण आहे .गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी आनंदाने साजरी केली.तसेच शाळेचा हा उपक्रम गावाचा उपक्रम झाला आहे .गावातील लोकांनाही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्येही जनजागृती केली. त्यामुळे अनेक लोकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली.गितेवाडी शाळेतील विद्यार्थी कोणत्याही बाबींचे प्रदूषण होऊ देत नाहीत.प्रदूषण किती घातक असते हे त्यांना शिक्षकांनी वेळोवेळी सांगून जनजागृती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजले आहे.आपल्याला आपल्या भावी पिढीला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी आमच्या शाळेत हा उपक्रम नेहमी राबविला जातो असे या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे.गावातील लोकांनी व सर्व अधिकारी यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा