अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी शासनाच्या शिकू आनंदे उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना साहित्य कवायत बाबत उत्कृष्ट कृतिशील मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत ३ जुलै २०२१ पासून दर शनिवारी सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिकू आनंदे हा उपक्रम आयोजित केला जातो.शिकू आनंदे हा उपक्रम इयता पहिली ते पाचवी आणि इयता सहावी ते आठवी मधील राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे आनंददायी पद्धतीने राबविला जातो.यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात आनंदातून कृतीयुक्त शिक्षण व ज्ञान मिळत आहे. उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी राज्यातील इयता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना साहित्य कवायत बाबत कृतिशील आनंददायी पद्धतीने मार्गदर्शन करून साहित्य कवायत प्रकार करून घेतले राज्यातील.इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांना त्यांनी डंबेल्स प्रकार तर इयता सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ