अहमदनगर-नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी शासनाच्या शिकू आनंदे उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना साहित्य कवायत बाबत उत्कृष्ट कृतिशील मार्गदर्शन केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत ३ जुलै २०२१ पासून दर शनिवारी सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिकू आनंदे हा उपक्रम आयोजित केला जातो.शिकू आनंदे हा उपक्रम इयता पहिली ते पाचवी आणि इयता सहावी ते आठवी मधील राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे आनंददायी पद्धतीने राबविला जातो.यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात आनंदातून कृतीयुक्त शिक्षण व ज्ञान मिळत आहे. उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी राज्यातील इयता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना साहित्य कवायत बाबत कृतिशील आनंददायी पद्धतीने मार्गदर्शन करून साहित्य कवायत प्रकार करून घेतले राज्यातील.इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांना त्यांनी डंबेल्स प्रकार तर इयता सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी घुंगरू काठीचे विविध प्रकारबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन करून हे प्रकार राज्यातील विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट पणे करून घेतले . तसेच साहित्य कवायतीचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना कृतिशील पणे समजावून सांगितले. तसेच यावेळी राज्यातील इतर शिक्षकांनी विविध विषयांवर कृतिशील मार्गदर्शन केले .या सादरीकरण बद्दल उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.राज्यातील विद्यार्थी आनंदाने या कृतिशील उपक्रमात सहभाग घेत आहेत . त्यामुळे राज्यात हा उपक्रम घराघरात जाऊन लोकप्रिय उपक्रम झाला आहे.यासाठी राज्यातील शिक्षक व अधिकारी परिश्रम घेत आहेत .हा उपक्रम दिनकर टेमकर हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक असताना त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला.या उपक्रमाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ व ज्योती बेलवले हे अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत.सध्या हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह ,शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे , उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे , ,उपसंचालक विकास गरड ,उपविभागप्रमुख सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट पणे राबविला जात आहे.
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा