मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो .हा पर्यावरण दिन कशासाठी साजरा केला जातो ? पर्यावरण म्हणजे काय ? पर्यावरणाचा आणि आपला काय संबंध आहे ? पर्यावरणाचे संवर्धन का करायचे? प्रदूषण निवारण का करायचे ? या सर्व बाबी आपणाला माहीत असल्या पाहिजेत.त्यासाठी पर्यावरण म्हणजे काय ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. पर्यावरण हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा वाचतो , पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर पर्यावरणावर आधारित अनेक पुस्तके आपल्याला पहायला मिळतात . पण खरच आपण या पर्यावरणाकडे पाहिजे तेवढ्या  गांभीर्याने लक्ष देतो का  ? पर्यावरण म्हणजे काय ते आपण समजावून घेतो का? ही बाब खूप महत्त्वाची आहे .आपल्या सभोवती असणाऱ्या जैविक व अजैविक घटकांना पर्यावरण असे म्हणतात . किंवा पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असणारे सर्व सजीव व निर्जीव घटक .अशी साधी सरळ पर्यावरणाची व्याख्या आपल्याला करता येते. पर्यावरणात निसर्ग ,हवा पाणी , नद्या ,नाले ,ओढे , डोंगर पर्वत  , झाडे ,वेली ,जमीन ,सागर, पशुपक्षी , प्राणी  आणि इतर सर्व सजीवांचा  व निर्जिवांचा समावेश होतो. पर्यावरणाच्या साखळीत सजीव आणि निर्जीव यांचा आपल्याला उपयोग होत असतो.हवा, पाणी , अन्न ,वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत.आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातून म्हणजे निसर्गातून आपल्या या मूलभूत गरजा पूर्ण होतात. म्हणून परिसराची आपण जपणूक केली पाहिजे .औद्योगीकरण आणि वृक्षतोड यामुळे हवामान बदल झाला. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा प्रचंड वापर यामुळे जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे. कारखान्यातील दूषित वायू , वाहनांचा धूर यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे .हवेचे प्रदूषण झाल्यामुळे वेगवेगळे आजार  होत आहेत .कारखान्यातील दूषित पाणी  व  कचरा ओढ्याच्या ,नदीच्या   पाण्यात सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे अनेक जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. पाण्याच्या प्रदूषणामुळे आपण विविध आजारांना बळी पडत आहोत .रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नाचे प्रदूषण होते.हे आपल्या आरोग्यास घातक आहे.
 म्हणून  आपण सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे . आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही एक जागतिक समस्या आहे. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास आपण  कारणीभूत आहोत .आपण आपला विकास केला परंतु या विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी  जेवढी कार्यवाही करणे गरजेचे होते  तेवढी कार्यवाही व उपाययोजना  केली का ? याचा विचार आपण केला पाहिजे . म्हणून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करताना फक्त या दिवशी झाडे लावली पाहिजेत असे नाही तर वेळोवेळी आपण झाडे लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो तसेच हवेचे प्रदूषण थांबते. आपण आपल्या पातळीवर पर्यावरणाचा विचार करून कार्यवाही केली पाहिजे . आपल्या अनेक चुकीच्या गोष्टीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे .हे समजून जर आपण पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपल्याला आणि सर्व सजीवांना जगणे कठीण होईल. म्हणून पर्यावरणाची समस्या समजावून घेऊन त्यावर आपण सर्वांनी उपाय योजना करणे गरजेचे आहे . तसेच प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदूषण वाढते . म्हणून आपण प्लॅस्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर  केला पाहिजे .कचरा कचराकुंडीत टाकला पाहिजे .दूषित पाणी शोषखड्ड्यात सोडले पाहिजे .शोषखड्ड्याजवळ झाड लावले .आमच्या शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम नेहमी राबविला जातो .या उपक्रमात विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा कृतिशील सहभाग घेतला जातो. शाळेत आणि शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या घराजवळ प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केले जाते. दरवर्षी विद्यार्थी अनेक झाडांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन. करतात .त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.शाळेत कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट दिले जाते. विद्यार्थ्यांचे वाढदिवस झाडाचे रोप भेट देऊन साजरे केले जातात. त्यासाठी शाळेत रोपवाटिका तयार केली जाते. शाळेमार्फत  वृक्षारोपणासाठी दरवर्षी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना अनेक झाडांची रोपे वाटप केली जातात. कोरोनाकाळात  वृक्षारोपणासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या घरी जाऊन रोपे वाटप करून वृक्षारोपन केले. हवेचे प्रदूषण थांबवण्यासाठी  विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे  करतात. विद्यार्थी पाण्यामध्ये कचरा टाकत नाहीत. पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत.शाळेत सेंद्रिय परसबाग तयार केली जाते ते पाहून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक सेंद्रिय शेती करू लागले आहेत . त्यासाठी गांडूळ खत प्रकल्प तयार करतात .शाळेत कचरा व्यवस्थापन केले जाते.अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे मूल्य कृतीतून रुजविले आहे .या कार्यासाठी   उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी यांची वेळोवेळी  मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.
   चला तर मग आपल्याला व सर्व सजीवांना  आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी आपणही सर्वजण पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण या सामाजिक कार्यात कृतिशील सहभाग घेऊ या.

लेखक 
तुकाराम तुळशिराम अडसूळ 
   प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो.७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

व्हिडिओ निर्मिती - संजना

स्टार्स (STARS) उपक्रमांतर्गत 2560  व्हिडिओ निर्मिती. -------------------------------------- पटकथा लेखन j ---------------------------------------- व्हिडिओ क्रमांक -22 इयत्ता  - नववी वदहावीच्या विषय - मराठी  पाठ घटक क्रमांक -१० पाठ घटकाचे नाव -  यंत्रांनी केलं बंड  उपघटक /पठ्यांश   - १) कथांचे विविध प्रकार सांगून विज्ञान कथेचा परिचय . २) पाठाचे प्रकट वाचन. वेळ -३५ मिनिट शिक्षकाचे नाव - श्रीमती संजना भगवंत चेमटे  पदनाम  - उपाध्यापिका  शाळेचे नाव -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका -अहिल्यानगर  जिल्हा -अहिल्यानगर . ---------------------------------------- अध्ययन निष्पत्ती -  १)विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. २)योग्य आरोह- अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करतत. दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -१० निर्मिती कार्यालयाचे नाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर  जिल्हा -  अहिल्यानगर  पाठाचे स्वरूप  -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्...