मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री च्या योग शिक्षिका रचनाताई फासाटे यांचे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन योग प्राणायम शिबिर

अहमदनगर-  मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या च्या योग टिचर रचनाताई फासाटे यांनी भारत देशातील आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक ,शिक्षिका ,अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर ११ मे २०२१पासून १६ मे २०२१ पर्यंत आयोजीत केले होते.या शिबिरात सुमारे ५०० शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंब  सहभागी झाले होते.सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती   व  ऑक्सिजन पातळी वाढली पाहिजे.आपले आरोग्य निरोगी राहिले पाहिजे. .आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सध्या योग प्राणयामची अत्यंत आवश्यकता आहे .हा उद्देश  समोर ठेवून मोरक्को देशातून योगा ट्रेनर रचनाताई  सदाफुले  / फासाटे यांनी झूम मिटिंगद्वारे हे योग प्राणायाम शिबिर  दररोज एक तास असे सहा दिवस घेतले.  या शिबिरात त्यांनी सर्व प्रकारच्या योग प्राणायाम बाबत आनंददायी व कृतिशील मार्गदर्शन करून  शिक्षकांकडून हे योग प्राणायाम करून घेतले. या शिबिरात सर्वांनी आपल्या कुटुंबासह उस्फ...

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा स्वाध्याय उपक्रम

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा स्वाध्याय उपक्रम दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे आणि Leadership for Equity (LFE) संस्था व ConveGenius यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय (SWADHYAY)Student WhatsApp Based Digital Home Assessment Yojana या उपक्रमाचे  उद्धाटन राज्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थतीत झाले.कोरोनामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम  सुरू करण्यात आला.या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून राज्यातील इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण संवादाचे माध्यम  मोबाईल मधील Whats App वापरून स्वाध्याय सोडवून घेण्यास सुरुवात करण्यात आली.  या उपक्रमासाठी मोबाईलवर whats App द्वारे विद्यार्थ्यांची नावनोंदणी करायची होती. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ही डोंगराळ भागातील पहिलीपासून चौथीपर्यंत वर्ग असलेली द्विशिक्षकी शाळा आहे.  कोरो...

पर्यावरण दिनानिमित्त लेख

५ जून रोजी जागतिक पर्यावरण म्हणून साजरा केला जातो.पण पर्यावरण दिन नुसता साजरा करून उपयोग नाही तर त्याला कृतीची जोड दिली पाहिजे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण याबाबत आपण कृतिशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये तसे मूल्य रुजविणे महत्वाचे आहे.  पर्यावरण व प्रदूषण हे शब्द आपण अनेकवेळा ऐकतो आणि वाचतो .परंतु पर्यावरण व प्रदूषण म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे.आपल्या सभोवती असलेल्या जैविक व अजैविक घटकांना आपण  पर्यावरण  म्हणतो.तर प्रदूषण म्हणजे म्हणजे दूषित होणे तसेच त्यापासून सजीवांना अपाय होणे .अशी साधी सरळ व्याख्या आपल्याला करता येईल .आपल्या सभोवतालची सर्व प्रकारची परिस्थिती जर अनुकूल असेल तर सजीवांना जीवन जगणे अनुकूल असते .परंतु जर आपल्या सभोवतालची नैसर्गिक व मानवनिर्मित परिस्थिती प्रतिकूल असेल तर सजीवांच्या जगण्यास बाधा निर्माण होते.म्हणून सर्व संजीवांना निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या सभोवतालची परिस्थिती अनुकूल राहण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे तितकेच  महत्वाचे आहे.त्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे सम...

५ जून २०२१जागतिक पर्यावरण दिन निमित्त लेख -

जागतिक पर्यावरण संवर्धन दिन पाच जून हा जागतिक पर्यावरण संवर्धन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.पर्यावरण म्हणजे काय हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.मग पर्यावरण संवर्धन आपण का करायचे हे आपल्या लक्षात येईल. पर्यावरण म्हणजे जैविक व अजैविक असे दोन्हीही घटक.  कोरोनासारख्या महामारीने आपण खूप काही शिकलो. यामुळे आपल्याला ऑक्सिजन चे महत्व समजले.परंतु हा ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे आपण लावली पाहिजेत .त्यासाठी आपल्याला झाडांचे महत्व समजले पाहिजे.त्यासाठी आपण सर्वांनी वेळोवेळी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन आपण केले पाहिजे. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या व सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.या गरजा निसर्गातून म्हणजे आपल्या परिसरातून मिळत असतात म्हणून आपण आपल्या परिसराची जपणूक केली पाहिजे .हे एक फार मोठे पर्यावरण संवर्धन आहे. पर्यावरण संवर्धन  व प्रदूषण निवारण ही एक फार मोठी जागतिक समस्या आहे.  पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे अतिशय महत्वाचे आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण आपण...