मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा स्वाध्याय उपक्रम

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा स्वाध्याय उपक्रम

दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे आणि Leadership for Equity (LFE) संस्था व ConveGenius यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय (SWADHYAY)Student WhatsApp Based Digital Home Assessment Yojana या उपक्रमाचे  उद्धाटन राज्याचे शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थतीत झाले.कोरोनामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम  सुरू करण्यात आला.या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून राज्यातील इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण संवादाचे माध्यम  मोबाईल मधील Whats App वापरून स्वाध्याय सोडवून घेण्यास सुरुवात करण्यात आली.
 या उपक्रमासाठी मोबाईलवर whats App द्वारे विद्यार्थ्यांची नावनोंदणी करायची होती. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ही डोंगराळ भागातील पहिलीपासून चौथीपर्यंत वर्ग असलेली द्विशिक्षकी शाळा आहे.  कोरोनाबाबत योग्य प्रकारची दक्षता घेऊन  मास्क, सॅनिटायझरचा वापर करून  मी सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना व पालकांना  या उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे महत्व पटवून दिले.स्वाध्याय उपक्रमाचा असलेला नंबर सेव्ह करून  विद्यार्थ्यांची नावनोंदनी करण्यासाठी मदत केली. ज्यांना मोबाईल नव्हता त्यांची नोंदणी माझ्या मोबाईलवर केली .अशा प्रकारे या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना आनंदाने सहभागी केले.या उपक्रमांतर्गत  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांना Whats App वर  आठवड्यात प्रत्येक शनिवारी  विषयनिहाय प्रश्न पालकांच्या मोबाईलवर प्राप्त होऊ लागले.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा घरच्याघरी उपलब्ध झाल्या.याचा उपयोग शिक्षक ,विद्यार्थी व पालकांना झाला.हे सर्व प्रश्न Whats App वर ऑनलाईन सोडवायचे असतात .त्यासाठी Whats App वर त्या दिलेल्या नंबरवर हॅलो किंवा नमस्ते करून आलेल्या सूचनेप्रमाणे पुढे जायचे असते . प्रश्नांच्या उत्तरासाठी  पर्याय दिलेले असतात.त्यांपैकी कोणते उत्तर बरोबर आहे त्या उत्तराचा अचूक पर्याय क्रमांक लिहायचा अशी सविस्तर माहिती त्यांना दिली . त्याप्रमाणे विद्यार्थी विचारपूर्वक या प्रश्नांची उत्तरे शोधून त्या उत्तराचा अचूक पर्याय क्रमांक कोणता हे ऑनलाईन लिहू लागले.स्वाध्याय सोडवून पूर्ण झाल्यावर आपले किती प्रश्न बरोबर आले याबाबत लगेच संदेश येतो.त्यानंतर लगेच या स्वाध्यायची उत्तरपत्रिका येते त्यामुळे आपले कोणते प्रश्न बरोबर आले ,कोणते प्रश्न चुकले , प्रश्नांचे बरोबर उत्तर कोणते हे विद्यार्थ्यांना लगेच समजू लागले.नंतर सरावासाठी ही उत्तरपत्रिका विद्यार्थी पुन्हा वहीत सोडवून घेवू लागलो .त्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला सराव झाला .स्वाध्याय उपक्रमातील प्रश्न हे अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतात .त्यामुळे आपण केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना किती प्रमाणात  समजले  याचे मूल्यमापन होते.विद्यार्थ्यांना आणखी कोणत्या घटकांवर मार्गदर्शन केले पाहिजे हे  समजू लागले. त्यामुळे  विद्यार्थ्यांना संबंधित घटकाबाबत   आणखी सविस्तर मार्गदर्शन करू लागलो .सर्व विषयांमधील घटकांचा सखोल अभ्यास करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थी सर्व विषयातील घटकांचा सखोल अभ्यास करू लागले. या उपक्रमातील प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला  व विचारांना चालना देणारे असल्यामुळे त्यांच्या बुद्धीला व विचारांना चालना मिळाली. या उपक्रमात काही अडचणी आल्या कारण काही विद्यार्थ्यांना मोबाईल नव्हते ,काहींना इंटरनेट नव्हते . त्यामुळे या अडचणींवर मात करण्यासाठी व विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवून घेण्यासाठी कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन माझ्या मोबाईलवर विद्यार्थ्यांकडून  स्वाध्याय सोडवून  घेतले . शुक्रवार पर्यंत स्वाध्याय सोडवल्यावर शनिवारी पुन्हा नवीन स्वाध्यायची विद्यार्थी वाट पाहू लागले.शनिवारी नवीन स्वाध्याय आल्यावर विद्यार्थी लगेच  उत्सुकतेने हा स्वाध्याय सोडवू लागले.त्यांना यामध्ये आवड निर्माण झाली .राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळेतील ,तालुक्यातील ,जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी हे स्वाध्याय सोडवले हे तपासण्याची सुविधा दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील सहभाग समजला .आपला वर्ग , आपली शाळा ,तालुका ,जिल्हा प्रगती कशी आहे हे समजले .त्यामुळे या उपक्रमातील विद्यार्थी सहभाग वाढविण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली.या स्वाध्यायमध्ये पाठाच्या खाली दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त पाठावर आधारित इतर प्रश्न असल्यामुळे विद्यार्थी पाठाचे सखोल वाचन करू लागले.त्यामुळे त्यांचे वाचन आणखी वाढले.शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर काही प्रश्न  आणि पर्याय क्रमांक लिहायचा  असल्यामुळे त्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया रचण्यास मदत झाली.पालकांनाही या उपक्रमाचे महत्व समजल्यामुळे त्यांनी मोबाईलवर आलेला स्वाध्याय  विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडवून घेवू लागले  .विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय उपक्रमाचा चांगला फायदा झाला.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी ,राष्ट्र व समाजहितासाठी विविध प्रकारचे योग्य मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी  पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमातील प्रश्नाबरोबर  इतर अनेक प्रकारचे प्रश्न या स्वाध्यायमध्ये असतात.काही वेगळे प्रश्नही या स्वाध्यामध्ये असतात .उदा- शाळेत तुम्हाला पैसे सापडले तर तुम्ही काय कराल?स्पर्धेत तुमचा संघ हरला तर तुम्ही कसे वागाल ?पुराचे पाणी अचानक गावात शिरले तर तुम्ही काय कराल?विशेष गरज असलेल्या व्यक्तींशी आपण कसे वागावे ?वृद्ध व्यक्तींशी कसे वागावे?पर्यावरणावर काही प्रश्न असतात .अशा अनेक प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य मूल्य रुजण्यास या उपक्रमाचा उपयोग झाला.म्हणून स्वाध्याय उपक्रम हा  विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास अतिशय प्रेरणादायी आहे.

लेखक
तुकाराम  तुळशिराम अडसूळ
   प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर 
मो७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏