जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
पाच जून हा जागतिक पर्यावरण संवर्धन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.पर्यावरण म्हणजे काय हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.मग पर्यावरण संवर्धन आपण का करायचे हे आपल्या लक्षात येईल.
पर्यावरण म्हणजे जैविक व अजैविक असे दोन्हीही घटक. कोरोनासारख्या महामारीने आपण खूप काही शिकलो. यामुळे आपल्याला ऑक्सिजन चे महत्व समजले.परंतु हा ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे आपण लावली पाहिजेत .त्यासाठी आपल्याला झाडांचे महत्व समजले पाहिजे.त्यासाठी आपण सर्वांनी वेळोवेळी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन आपण केले पाहिजे. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या व सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.या गरजा निसर्गातून म्हणजे आपल्या परिसरातून मिळत असतात म्हणून आपण आपल्या परिसराची जपणूक केली पाहिजे .हे एक फार मोठे पर्यावरण संवर्धन आहे.
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही एक फार मोठी जागतिक समस्या आहे.
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे अतिशय महत्वाचे आहे.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण आपण थांबविले पाहिजे .यासाठी आम्ही
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा समाज व राष्ट्रहिताचा नवोपक्रम शाळेत यशस्वीपणे राबविला व पुढेही राबवित आहोत.या उपक्रमात पालक व ग्रामस्थ या सर्वांना सहभागी करून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ,पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे मूल्य कायमस्वरूपी रुजले आहे. शाळेतील विद्यार्थी हे उद्याच्या काळात देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत .त्यामुळे त्यांची बालवयात शालेय शिक्षणात योग्य जडणघडण होत असताना त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाज व देशहिताचे मूल्य शिक्षणातून रुजणे अत्यंत आवश्यक आहे .मानवासह सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी आणि आपल्या देशाची व समाजाची ही समस्या शिक्षणातून सोडविण्यासाठी आम्ही या नवोपक्रमाची निवड करून तो शाळेत यशस्वीपणे राबविला आहे.या शाळेत बदलीने हजर झालो तेव्हा या शाळेत शिक्षणाला पूरक निसर्गरम्य व आनंददायी वातावरण नव्हते .त्यामुळे या सामाजिक उपक्रमाचे उत्कृष्टपणे नियोजन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला . पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .या सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन या कार्यात कृतिशील सहभाग घ्यावा म्हणून आम्ही हा उपक्रम कायमस्वरूपी राबवित आहोत. शाळेत सर्वांच्या उपस्थितीत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण केले.त्या सर्व झाडांचे संवर्धन केले.शाळेत सेंद्रिय परसबाग तयार करून कुंडीतील रोपांची लागवड केली.शाळेत शिक्षणाला पूरक निसर्गरम्य आनंददायी वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांना ,पालकांना ,ग्रामस्थांना ,गावातील माध्यमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपनासाठी सुमारे दोन हजार झाडांची रोपे वाटप केली . झाडे आपल्याला प्राणवायू देतात .या प्राणवायूची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर कळते परंतु जी झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात त्यांचे महत्व आपल्याला समजले पाहिजे .त्यामुळे हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांपुरता ,शाळेपुरता मर्यादित न राहता हा उपक्रम सर्व गावाचा झाला पाहिजे म्हणून नेहमी याबाबत ग्रामस्थांमध्ये कृतिशील जनजागृती केली . दरवर्षी शाळेतून ग्रामस्थांना विविध झाडांची रोपे वाटप करतो .यावर्षी कोरोनाच्या काळातही आम्ही ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करून वृक्षारोपणासाठी विविध झाडांच्या रोपांचे वाटप केले .सर्वांनी या रोपांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करीत आहेत. तसेच त्यांनी प्लॅस्टिक पिशव्या न वापरता पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करणे ,कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करणे , कचरामुक्त शाळा ,वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता कायम राखणे ,हवा ,पाणी ,अन्न या सजीवांच्या गरजांचे व इतर बाबींचे प्रदूषण रोखणे ,प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करणे ,परसबाग , रोपवाटीका ,परिसर भेट ,पर्यावरण सहल ,वनभोजन ,सेंद्रिय शेती ,सेंद्रिय भाजीपाला बाजार ,पर्यावरण संदेश जनजागृती पाट्या, नातेवाईकांना पर्यावरण संवर्धनाबाबत संदेश पाठविणे ,स्वच्छ शाळा स्वच्छ गाव स्वच्छ भारत ,प्राणी पक्षी यांना चारापाणी , विद्यार्थ्यांचा वाढदिवस झाडाचे रोप देऊन साजरा करणे ,झाडांचे वाढदिवस साजरे करणे ,कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट देणे असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे. तसेच माता पालक मेळावे ,पालक मेळावे ,माजी विद्यार्थी मेळावा ,शाळा व्यवस्थापन समिती सभा मधून हवा , पाणी , अन्न ,ध्वनी व इतर प्रदूषणबाबत चर्चा करून जनजागृती केली .त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या घराजवळ सेंद्रिय परसबाग तयार केली .काही पालक सेंद्रिय शेती करू लागले.ग्रामस्थ पर्यावरणाचे रक्षण करून प्रदूषण निवारण करतात. गावातील सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट आम्ही लावतो.शाळेत लोकसहभागातून स्वच्छतागृह नुतनीकरण व हॅन्डवॉश स्टेशन बांधकाम केल्यामुळे काही बाबींचे प्रदूषण थांबले . विद्यार्थी वेळोवेळी झाडांची देखभाल घेऊन त्यांनी झाडांशी मैत्री केली आहे.ग्रामस्थांनीही झाडांशी मैत्री केली आहे.प्रदूषण होऊ नये म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ दरवर्षी प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात .पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाहीत.अन्नाचे प्रदूषण होऊ देत नाहीत.विद्यार्थी व ग्रामस्थ वेळोवेळी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन करतात .गावाला या उपक्रमात सहभागी करून घेतल्यामुळे .शाळेचा उपक्रम गावाचा उपक्रम झाला याचे मनस्वी समाधान होते.तसेच समाजात विविध ठिकाणी पर्यावरण कार्यशाळा ,पर्यावरण संमेलन ,वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम आम्ही वेळोवेळी राबवित असतो.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
मो-7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा