🙏जीवसृष्टी वाचवा अभियान 🙏
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि
मुरली फौंडेशन अहमदनगर
संयुक्त विद्यमाने आयोजित
*जीवसृष्टी वाचवा अभियान*
संपूर्ण विश्वातील सजीव सृष्टीला वाचविण्यासाठी, पुढील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी, आरोग्यसंपन्न जीवन मिळण्यासाठी आम्ही उपरोक्त संस्थांच्या वतीने *जीवसृष्टी वाचवा अभियान* घोषित करीत आहोत.
या अभियानांतर्गत राज्यभरातील सर्व पर्यावरण प्रेमी बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना, तज्ज्ञ मार्गदर्शकांना आवाहन करीत आहोत... आपण आपल्या खाली दिलेल्या विषयातील अभ्यास, अनुभव आणि कार्यानुरूप कृतिशील प्रकल्प तयार करावा. तो टाईप करून मेलवर आणि एक प्रत पोस्टाने हार्ड कॉपी स्वरूपात खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
कोणत्याही एका विषयावर सविस्तर कृतिशील प्रकल्प तयार करावा .
प्रकल्प विषय खलील प्रमाणे
१)हवा
२) पाणी
३) जमीन
४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
५) वन्यजीव संरक्षण
६) पक्षी संरक्षण
७) मधमाशी संरक्षण
८) प्लॅस्टिक
९) सेंद्रिय शेती
१०) साथीचे आजार
११) स्वच्छता
१२) कचरा
१३) ग्लोबल वॉर्मिंग
१४) आरोग्यपूर्ण जीवन
हा प्रकल्प कसा असावा
१)शिक्षक ,विद्यार्थी सर्व नागरिकांना उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सहज कृतिशील सहभाग घेता येईल असा असावा
२)ग्लोबल वॉर्मिंग मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत व यापुढेही भयंकर समस्या निर्माण होऊ शकतात, या समस्या थांबविण्यासाठी कृतीशील प्रकल्प असावा .
३) सध्या जगात निर्माण होणारे विविध प्रकारचे विषाणूमुळे सजीवसृष्टी धोक्यात येत आहे ,यावर कृतिशील प्रकल्प असावा.
४)हा प्रकल्प स्वतः तयार केलेला असावा ,कॉपी पेस्ट नसावा
या अभियानासाठी योग्य कृतिशील प्रकल्प तयार करणाऱ्या प्रथम तीन व्यक्तींना तीन प्रकल्पांना महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने राळेगण सिद्धी ता.पारनेर जिल्हा अहमदनगर येथे राज्यपातळीवर महाराष्ट्र पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येईल . तसेच इतर उत्कृष्ट दहा प्रकल्पांना उत्तेजनार्थ गौरविण्यात येईल . तसेच सहभागी सर्वांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल .
पुरस्काराचे स्वरूप *प्रथम* *क्रमांक* *तीन* *हजार* , *द्वितीय* *दोन* *हजार*, *तृतीय* *एक* *हजार*, *उत्तेजनार्थ* *पाचशे* *रुपये*, *सन्मानचिन्ह*, *प्रमाणपत्र* असे राहील. याबाबत पर्यावरण पुस्तिका तयार करून उत्कृष्ट अनेक प्रकल्पांना त्यात प्रसिद्धी देवून प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल.
प्रकल्प मराठी भाषेत टाईप वर्ड सॉफ्टवेरमध्ये युनिकोड फॉण्ट वापरून किंवा मराठी टायपिंग मोबाईलवर टाईप करून पाठवावा किंवा ज्यांना टायपींग ची सोय नाही त्यांनी हस्तलिखित प्रकल्प लेखन करून तयार केला तरी चालेल .सध्या सर्वांना वेळ आहे मग या वेळेचा सदुपयोग अवश्य करा .
या प्रकल्पावर संपर्कासाठी आपले पूर्ण नाव ,पत्ता , मोबाईल नंबर असावा ,व्हाट्सअप्प मोबाईल नंबर असेल तर तो टाकावा नसेल तर जो असेल तो टाकावा .
प्रकल्प पाठविण्यासाठी अंतिम तारीख *१५*
*मे* *२०२०*
टाईप केलेला प्रकल्प पाठविण्यासाठी
ई मेल
*saigifts2008@gmail.com*
हार्ड कॉपी किंवा हस्तलिखित प्रकल्प पाठवण्यासाठी
पोस्टाचा पत्ता
*साई* *गिफ्ट्स*
यशोदा
साई मंदिर समोर
सर्जेपुरा
अहमदनगर
पिन ४१४००१
अधिक संपर्कासाठी
🙏🏻 *ही* *पोस्ट* *पुढे* *इतर* *ग्रुप* *वर* *पाठवून* *देशहितासाठी* *सहकार्य* *करावे* *ही* *विनंती* 🙏🏻
प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क केला तरी चालेल .
✔ वृक्षमित्र आबासाहेब मोरे ,
अध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अहमदनगर ,
मो 7588603861
✔राजेश बागडे
अध्यक्ष
मुरली फौंडेशन अहमदनगर
मो 9822068935
✔तुकाराम अडसूळ
कार्यालयीन सचिव
पर्यावरण मंडळ
अहमदनगर
मो 7588168948
✔ धीरज वाटेकर
चिपळूण ,रत्नागिरी
राज्य सचिव
राज्य प्रसिध्दीप्रमुख
पर्यावरण मंडळ
महाराष्ट्र राज्य
मो 9860360948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा