व्ही .डी.ओ.कॉन्फरन्स उपक्रमातून विद्यार्थ्यांना जगाची ओळख (२२ सप्टेंबर २०२०) अहमदनगर जिल्हा परिषद आणि ग्लोबल नगरी फौंडेशन अमेरिका यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून राबविला जातो.अहमदनगर जिल्ह्यातील जे भूमिपुत्र जगात विविध देशात इंजिनियर अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.त्या सर्वांना अमेरिकेतील अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ.किशोर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी एकत्र आणले.ग्लोबल नगरी सदस्य ,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्ह्यातील कृतिशील शिक्षक बंधू भगिनी यांचा एकत्रित व्हाट्सअप ग्रुप करून याबाबत चर्चा होऊन माहिती दिली जाते.त्यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ,ग्रामस्थ यांचेशी संवाद साधून विविध बाबींवर चर्चा , मार्गदर्शन केले जाते.या व्हिडीओ कॉन्फरन्स साठी आमच्या शाळेचा समावेश होण्यासाठी आम्ही संपर्क केला. जिल्हा परिष...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ