नवोपक्रम शीर्षक - वाचनाचा लळा फुलवी जीवनाचा मळा. प्रास्ताविक-श्रवण ,भाषण ,वाचन ,लेखन ही भाषा विकासाची कौशल्ये माणसाच्या जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेची आहेत.त्यापैकी वाचन कौशल्य अतिशय महत्वाचे आहे."वाचाल तर वाचाल "असे आपण अनेकवेळा ऐकतो.यामधून आपल्याला वाचनाचे महत्व समजते.वाचनाने आपल्याला ज्ञान मिळते.वाचन माणसाला चांगला माणूस बनविते. जीवनाला योग्य दिशा मिळते.वाचनाने योग्य-अयोग्य याची जाणीव होते.म्हणून वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो.वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो.वाचनामुळे वाचकांवर चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.यामुळे विविध प्रकारच्या योग्य मूल्यांची रुजवणूक होते.आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत. शिक्षणातून देशाचे सुजान नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजणे अतिशय महत्वाचे आहे.वाचन हे पुस्तकांचे ,मासिकांचे ,कादंबरीचे ,वर्तमानपत्रांचे असे विविध घटकांचे असते.वाचनातून ज्ञानाबरोबर आनंद मिळतो . त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे गरजेचे असते. वाचनामुळे व्यक्तीला आपले विचार प्रभावीपण...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ