माझी शाळा माझे विज्ञान प्रयोग समाजाच्य विकासासाठी ,अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ,संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी ,पर्यावरण संवर्धनासाठी ,प्रदूषण निवारण करण्यासाठी ,वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी ,निरीक्षणशक्ती वाढविण्यासाठी ,समाजातील अनिष्ठ रूढी दूर करण्यासाठी ,अनुमान व निष्कर्ष काढण्यासाठी ,परिसराविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी ,आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी विज्ञानातील विविध प्रयोगांचा अतिशय उपयोग होत असतो.त्यासाठी विज्ञान शिक्षक हा प्रयोगशील व कृतिशील असणे महत्त्वाचे असते.विज्ञानातील विविध मूलभूत संकल्पना आणि घटक समजण्यासाठी विविध प्रयोग करून सिद्ध करणे किंवा त्याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष कृतीतून समजावून देणे अत्यंत महत्वाचे असते.विज्ञान विषयाचे अध्ययन अध्यापन आनंददायी करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानातील विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण करणे तितकेच महत्वाचे असते. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोगातून विज्ञानाचे कृतिशील अनुभव दिले पाहिजेत.विज्ञान विषयातील प्रयोगांची इतर विषयांशी सांगड घातली पाहिजे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील ज्ञानाच्या कक्षा विस्ता...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ