आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध घटकांची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी ,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ,त्यांना विज्ञानातील प्रयोगांची निर्माण व्हावी , निरीक्षणशक्ती वाढावी ,आत्मविश्वास निर्माण व्हावा ,त्यांच्यातील अंधश्रद्धा व अज्ञान दूर व्हावे ,त्यांना सत्यता पटावी ,वस्तुस्थिती समजावी ,त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजावे , त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विज्ञानातील विविध घटकांचे अध्यापन हे आनंददायी पद्धतीने करून विविध प्रयोगांचे कृतिशील अनुभव विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिले जातात.विज्ञानातील विविध घटकांवर आधारित विज्ञान प्रयोगांचे अगोदर नियोजन केले जाते.या नियोजनात प्रयोगाचा विषय ,प्रयोगाचे नाव ,दिनांक ,वेळ ,स्थळ , उद्देश ,प्रयोगासाठी लागणारे साहित्य ,प्रयोगाची तपशीलवार कृती ,इतर निरीक्षणे ,निष्कर्ष या बाबींचा समावेश केला जातो.या प्रयोगासाठी शाळेत एका स्वतंत्र वर्गखोलीत विज्ञान प्रयोगशाळा तयार केली आहे.या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे विविध तयार केलेले मॉडेल ,प्रतिकृती , विविध प्रयोगांचे साहित्य ,विविध विज्ञान प्रयोगांची पुस्तके यांचा समावेश आहे.
शासनाकडून आलेल्या विज्ञानपेटीतील साहित्याचाही वेळोवेळी विज्ञानातील विविध प्रयोग करण्यासाठी वापर केला जातो .बालआनंद मेळावा आणि गणित विज्ञान प्रदर्शनात आमच्या शाळेतील विद्यार्थी विज्ञानातील विविध प्रयोग करून दाखवितात.विविध घटकांवर वेळोवेळी प्रयोग करून निष्कर्ष काढतात.
विद्यार्थ्यांना आम्ही पाठयपुस्तकातील आणि पाठयपुस्तकाबाहेरील अनेक विज्ञान प्रयोग वेळोवेळी करून दाखवतो आणि हे प्रयोग पुन्हा त्यांच्याकडून करून घेतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग बाबत विस्तृत कृतिशील ज्ञान मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.प्रयोगातून ते योग्य निष्कर्ष काढतात. परिसर व क्षेत्रभेटीतूनही विज्ञानातील विविध सोपे प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना कृतिशील माहिती व अनुभव दिले जातात.हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत.त्यामुळे त्यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे.
हवेचे प्रदूषण कसे होते हे समक्ष विद्यार्थ्यांना प्रयोगातून दाखविले जाते.दूषित हवेमुळे अनेक प्रकारचे आजार सजीवांना होतात हे हवा या पाठाचे अध्यापन करताना प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून देवून जनजागृती केली जाते.त्यामुळे विद्यार्थी हवेचे प्रदूषण करीत नाहीत.प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व पटवून दिले.
.या ऑक्सिजन चे महत्व विज्ञान प्रयोगातून समजल्यामुळे विद्यार्थी दरवर्षी घराजवळ व शेताच्या कडेला प्रचंड प्रमाणात वृक्षारोपन करून त्यांचे शंभर टक्के संवर्धन करतात. पाण्याचे प्रदूषण कसे होते ?पाणी प्रदूषणाचे दुष्परिणाम हे विद्यार्थ्यांना पाणी या पाठाचे अध्यापन करताना त्याबाबत प्रयोगातून समजावून दिले .त्यामुळे विद्यार्थी पाणी प्रदूषण करीत नाहीत.पाण्याचा वापर जपून करतात.पाणी हे जीवन आहे हे मूल्य त्यांच्यामध्ये प्रयोगातून रुजविले . विज्ञान प्रयोगातून मोलाचे अन्न हा पाठ शिकविताना अन्नाचे प्रदूषण कसे होते?त्याचे दुष्परिणाम कोणते?हे प्रयोगातून कृतिशीलपणे समजावून दिले.त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजांचे प्रदूषण होऊ देत नाहीत .सजीवांच्या वाढीसाठी हवा ,पाणी ,अन्न यांची गरज असते हे सजीवांची वाढ हा घटक शिकविताना या प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले . आपल्याला व इतर सर्व संजीवना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे हे त्यांना समजले . त्यामुळे विज्ञान प्रयोगातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे व समाजहिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .
विज्ञान प्रयोगामुळे बालवयात शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची योग्य जडण घडण होण्यास मोठी मदत झाली आहे.विद्यार्थ्यांमध्ये या प्रयोगामुळे योग्य परिवर्तन झाले आहे.
विज्ञानातील सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचे अध्यापन करताना प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जेथे पूर्ण होतात तेथेच ते सजीव आढळतात हा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून आणि परिसर भेटीतून विद्यार्थ्यांना दाखविला . या प्रयोगासाठी कुंडीतील दोन पानवनस्पती घेऊन त्यांना पाणी दिले.एका कुंडीतील रोपाला सतत पाणी दिले व दुसऱ्या कुंडीतील रोपाला कमी पाणी दिले .कमी पाण्याच्या कुंडीतील पाणवनस्पती सुकून गेली.या प्रयोगातून पाणवनस्पती पाण्याच्या ठिकाणी आढळतात किंवा त्यांना जास्त पाणी लागते हे विद्यार्थ्यांना कृतिशीलपणे समजले कारण विद्यार्थी सर्व प्रयोगात कृतिशील सहभाग घेतात. हवा या पाठाचे अध्यापन करताना ज्वलनासाठी हवेची गरज असते हे समजावून देण्यासाठी मेणबत्ती ,काचेचा ग्लास ,बशी काडीपेटी घेऊन मेणबत्ती पेटवून त्यावर काचेचा ग्लास ठेवला असता मेणबत्ती विझली गेली.यामधून ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून समजावून दिले .साठवण पाण्याची या पाठाचे अध्यापन करताना पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रयोग विद्यार्थ्यांना मातीचा ढीग करून त्यावर पावसासारखे पाणी सोडले .हे पाणी उताराच्या दिशेने वाहते ,जसा उतार असेल तशा वेगाने पाणी वाहते हे विद्यार्थ्यांना समजले. त्यामुळे आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणी अडवणे व पाणी जिरवणे अत्यंत महत्वाचे आहे हे त्यांना या प्रयोगातून कृतिशीलपणे समजावून दिले.पाणी अडवले नाही तर पाणी वाहून जाते .हे विद्यार्थ्यांना समजले . पाण्याचा वापर काटकसरीने करणे .पाणी ही आपली हवेनंतरची अतिशय महत्त्वाची गरज आहे .पाण्याचा जर आपण गैरवापर केला तर गोड्या पाण्याचे साठे मर्यादित आहेत ते संपून जाईल.तसेच काही ठिकाणी पाण्याअभावी दुष्काळ पडतो.त्यामुळे आपल्याला कायम पाणी लागत असते . त्यामुळे विद्यार्थी पाण्याचा वापर जपून करतात. तसेच गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्याने मातीचे कण खाली बसतात हा प्रयोग करण्यासाठी गढूळ पाणी व तुरटी घेऊन त्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवून दाखवली असता मातीचे कण पाण्याच्या तळाशी जाऊन बसले .त्यामुळे गढूळ पाणी स्वच्छ कसे करावे हे विद्यार्थ्यांना या प्रयोगातून समजले . या पाठातून स्वच्छ व पारदर्शक पाणी निर्धोक असते असे नाही हे प्रयोगातून समजावून दिले.त्यामुळे विद्यार्थी शुद्ध पाणी पितात.
शुद्ध पाण्याला चव नसते ,रंग नसतो ,वास नसतो .हा प्रयोग विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून प्रत्यक्ष अनुभव देऊन समजावून दिला . एखाद्या पाण्याला रंग ,चव आणि वास असेल तर ते पाणी पिण्यास आरोग्यास अपायकारक असते हे प्रयोगातून विद्यार्थ्यांना कृतिशीलपणे समजले.पाणी संथ ठेवून निवळता येते हे प्रयोगाद्वारे समजावून दिले .मोलाचे अन्न या पाठाचे अध्यापन करताना अन्न प्रदूषण कसे होते हे एका प्रयोगातून समजावून दिले .त्यामुळे विद्यार्थी अन्नाचे प्रदूषण करत नाही .चांगल्या सवयी समजावून देताना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत हे साध्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना समजावून दिले.जेवणापूर्वीचे तळहात निरीक्षण करा त्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हातावरील भागाचे निरीक्षण करा .यामध्ये लगेच फरक जाणवला .आपल्या आरोग्यासाठी व निरोगी राहण्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत हे विद्यार्थ्यांना समजले . विद्यार्थी जेवणापूर्वी तसेच दिवसभर वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुतात .त्यामुळे ते निरोगी राहतात .शाळेतील अशा साध्या साध्या प्रयोगातून त्यांच्यामध्ये आरोग्याच्या चांगल्या सवयी बाबतचे विविध मूल्य रुजविली आहेत.घसा दुखत असल्यास गरम पाण्याने गुळण्या कराव्यात ,सर्दी झाली तर गरम पाण्याची वाफ घ्यावी हे प्रयोग छोटे आजार व घरगुती उपचार या पाठाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे समजावून दिले.त्यामुळे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना सर्दी कशामुळे होते ,घसा का दुखतो हे समजले.त्यामुळे विद्यार्थी हे आजार झाल्यावर प्रथम उपचार म्हणून वेळोवेळी असे प्रयोग आपापल्या घरी करतात .आजार बरा न झाल्यास डॉक्टरांना दाखवितात.अशा प्रकारे आमच्या शाळेत विज्ञान विषयाचे अध्यापन करताना पाठयपुस्तकातील आणि पाठयपुस्तकाच्या बाहेरील असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांना वेळोवेळी करून दाखविले जातात .त्यानुसार विद्यार्थी हे प्रयोग करून निष्कर्ष काढतात.त्यांना सत्यता या विविध प्रयोगातून समजते. त्यांना विज्ञानातील प्रयोगांची आवड निर्माण झाली . विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.विज्ञानातील विविध प्रयोगाबाबतच्या पुस्तकांचे आवडीने वाचन करतात.विज्ञान प्रयोगासाठी लागणारे काही साहित्य तयार करतात. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागली. प्रयोगामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढीस लागली.त्यांच्यामध्ये संशोधन मूल्य रुजले आहे. विज्ञानातील विविध प्रयोगांचा वापर विविध विषयात करतात .त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थी विविध विज्ञान प्रयोग बाबत शास्त्रज्ञांची माहिती सांगतात व लेखन करतात. प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा नाहीशी झाली .त्यामुळे अज्ञान दूर होऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजले आहे.
तसेच परिसरातून व निसर्गातून आपल्या गरजा पूर्ण होतात हे त्यांना समजले व तसे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहे. त्यामुळे ते परिसराचे व निसर्गाचे रक्षण करू लागले .त्यामुळे राष्ट्र व समाजहिताचे परिवर्तन विद्यार्थ्यांमध्ये झाले. विज्ञान विषयक विविध स्पर्धेत विद्यार्थी कृतिशील सहभाग घेतात. पर्यावरण संवर्धनात जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत विविध ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदाने कृतिशील सहभाग घेतला .आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या आंतरराष्ट्रीय संस्थेने वतीने ऑनलाईन पद्धतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला. त्यामुळे पालकांना व गावाला शाळेचा अतिशय अभिमान वाटू लागला.
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता. पाथर्डी जि.अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा